Tuesday, 7 September 2021

डॉ.गेल ऑमव्हेट समजून घेताना! लेखक - प्रा. संजयकुमार कांबळे,

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची नव्या पद्धतीची मांडणी करणाऱ्या संशोधक -लेखिका, कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांच्या योगदानावर दोन दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावर पुस्तक संपादित करण्याचे काम सुरू आहे. प्रस्तुत लेख हा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर आधारित आहे.

तू बुद्धाचा माग काढत आलीस

चंगळवादी स्वदेश सोडून!

तू आमच्या लढ्याचा भाग झालीस.

तू चोखोबाची हाडं गोळा केलीस,

तू तुकोबाची गाथा शोधलीस.

तू नामदेवांची पताका ऊंच केलीस आम्हाला दिसेलशी

आणि एका प्राच्यबिंदूपासून, मध्ययुगीन भक्ती चळवळीपासून ते

आधुनिक काळापर्यंतचे समतेचे वारकरी वाद प्रतिवाद करत

पण हातात हात घालून आणलेस बेगमपुऱ्यात

धम्मसंगिनी!

डॉ. गेल ऑमव्हेट यांनी सामाजिक विचार आणि तत्वज्ञानाकडे चळवळ म्हणून पाहिले. तत्वज्ञान समाजान्मुख असावे, अशी त्यांची धारणा होती. सामान्य माणसांबद्दल त्यांच्या मनात खोल कणव होती. त्याच्या उत्थानासाठी जे जे करता येईल, ते ते त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या चिंतनाचा कार्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. शुष्क तत्वचिंतनामध्ये त्यांना स्वारस्य नव्हते.

भारताची स्वातंत्र्यलढयातून पुढे येऊन एका दिशेने वयातच सुरू होती. त्या दृष्टीने होणारी जागृती, प्रेरणा, उत्साह या गोष्टींनी निर्माण झालेले वातावरण प्रभावी होते. चळवळी, आंदोलने, घडामोडी, उलथापालथी यांचा तो काळ होता. १९७० नंतरचा काळ हा समस्या संघर्ष यांनी भरलेला, भारलेला होता. त्यामुळे केवळ विविध प्रकारच्या तीव्र कृतीच त्यात नव्हत्या तर विविध प्रकारचे विचार, सिद्धांत, तत्वे यांचा अभ्यास ऊहापोह होत होते. या गोष्टी समाजात एकित्रितपणे समाजाच्या विशिष्ट उद्देशासाठी होत असल्याने याविषयीचे वाद, संवाद, विवाद, चर्चा या गोष्टीही होत होत्या. याकाळात विचार, कृती, चळवळी यांचे वैविध्य होते त्यांच्यात संघर्ष होते. याकाळात एकूण जगात मार्क्सच्या विचारांचे प्राबल्य होते, त्यामुळे मार्क्सवादाचे वाचन, अध्ययन या गोष्टी वेगवेगळया अंगांनी होत होत्या. मार्क्सवादाने एक सामाजिक जाणीव जागृती केली होती. आणि सामाजिक प्रगतीसाठी एक दृष्टी, एक गती, एक उत्साह आणि स्फूर्ती दिली होती.

डॉ. गेल ऑमव्हेट यांचे भाषण ऐकताना व्यासपीठावर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम.


प्रा.गेल ऑमव्हेट याच काळात मार्क्सवाद, फुले-आंबेडकरवाद, स्त्रीवाद, समाजवाद, सामाजिक सिद्धांतांवरील वाचन, मनन करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विचाराला खोली गांभीर्य, ठामपणा व्यापकता प्राप्त होत गेली. त्यांच्या कार्यातून जसा त्यांचा विचार फुलत गेला तसेच त्यांच्या जीवनातून त्यांचे कार्य वृद्धींगत होत गेले. विचार कार्य यांचा परस्परावलंबी संबंध त्यांच्या जीवनात व्यक्तीमत्वात सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या चळवळ स्वरुपाच्या होत्या. त्यातील प्रत्येक गोष्टीला वैचारिक अधिष्ठान होते. यातूनच त्यांच्या व्यक्तीमत्वाची तात्विक बैठक घडत गेली. विकसित होत गेली आणि निष्ठांच्या स्वरुपात अभिव्यक् होत राहिली. भारतीय सामाजिक विचार आणि तत्वज्ञानाला समजून घेणारी दृष्टी भूमिका त्यांच्या वैचारिक साहित्यातून मिळते. त्यांचे प्रत्येक विचार हे आशयघन आणि सामाजिक, राजकीय समस्यांवरची समग्र प्रतिक्रिया आहे.

अफाट वाचनशक्ती, आणि भरपूर जगभर फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल ऑमव्हेट या सर्वत्र फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकार आणि सहभाग घेत राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात त्या नेहमीच पुढे राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या.

डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली, ‘ हिंदूया वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. हिंदूमधील लेख वाचून चक्क विरप्पन सुद्धा प्रभावीत झाला होता.

डॉ. गेल यांची कल्चरल रीवोल्ट इन कलोनियल सोसायटी- नॉन ब्राम्हीण मुव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड डेमॉक्रॅटिक रिव्हल्युलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेन्ट इन इंडिया अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ७० पेक्षा जास्त पुस्तक परीक्षणे त्यांनी अंतरराष्ट्रीय नियतकालिकांत लिहिली आहेत.

प्रा. गेल ऑमव्हेट भारताला देशाच्या सर्वांगीण् विकासाच्या दृष्टीने बघतात. मार्क्स, फुले, आंबेडकरांवर सर्वत्र संशोधन होत आहे, पण अमेरिकेतून भारतात येऊन रस्ता, मोर्चा, मंच, वृत्तपत्र, पुस्तक संशोधन संस्थांमध्ये त्यांना  सर्वांनी  पहिले आहे. त्यांचे हे वादळी व्यक्तीमत्व हजारो लाखो देश-विदेशी शोधकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत होते.

भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार ऑमव्हेट यांनी मांडला. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली. भारतात सुरु असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीने भारावून गेलेल्या गेल यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न घेऊन कष्टकरी जनतेच्या लढ्यात झोकून देऊन, झपाटून काम केले. डॉ गेल यांचे संशोधन, त्यांचे लिखाण, त्यांचा कष्टक-यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातुन केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला.

प्रा. गेल ऑमव्हेट यांच्या अभ्यासाची व्याप्ती आणि आवाका खूप मोठा आणि व्यापक आहे. आज अनेक विषयांत अंतिम निष्कर्षावर पोचण्यापूर्वी किंवा काही शंका असेल तर डॉ. गेल ऑमव्हेट काय म्हणतात, हे बघितले जाते. डॉ.गेल ऑमव्हेट या आधुनिक भारतातील सर्वात जैविक विचारवंतांपैकी एक विद्वान आणि महान स्त्रीवादी अंतर्दृष्टी असलेली व्यक्ती होती. येथी अनेक प्रस्थपित विचारवंताना  त्यांनी आव्हान दिले. कॉ. बी. टी. रणदिवे, अरुंधती रॉय, ते बालगोपाल यांचा त्यात समावेश होतो . जात, वर्ग, लिंगभाव, धर्म, वंश, रंगभेद त्याबाबत मार्क्स, फुले-आंबेडकरी तत्वज्ञान याचे आंतरशाखीय आकलन त्यांच्या संशोधनातून त्यांनी अभ्यासकांना करुन दिले. विविध राजकीय सामजिक भूमिकाचा चिकित्सक मागोवा घेतला. हे करीत असतांना अनेकदा त्यांनी घेतलेल्या भूमिकांबद्दल बरेच वाद-विवाद निर्माण झाले. उदाहरणार्थ आरक्षण किंवा शेतकरी संघटना याबाबत गेल ऑमव्हेट यांच्या भुमिका.

भारतातील बहुजनांनी केलेला संघर्ष बळी राज्य वा बहुजन राष्ट्र वा बेगमपुरा निर्मिती वा बौद्ध धम्म शोध यामागील प्रेरणा, बीजे पेरणा-या बहुजन नायक -नायिकांचे ऐतिहासिक योगदान गेल ऑमव्हेट यांनी सखोल संशोधनाद्वारे बाहेर आणले. त्यांच्या या संशोधनाचा पाया या देशातील बहुजन वा ब्राह्मणेतर जातींमधील स्त्री-पुरुषांचा राजकीय, आर्थिक, जातीय तसेच पुरुषसत्तेशी झालेल्या संघर्ष चळवळीतेील सहभागाची योग्य दखल घेणे आहे. कारण गेल स्वत: परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय राहिल्या.

ज्यावेळी येथील संशोधक मंडळी ब्राह्मणवादी संस्कृतीच्या पायावरच नवराष्ट्र राष्ट्रवादाची उभारणी करीत होते. तेव्हा गेल ऑमव्हेट, रोझालिंड -हँन्लो्न, एलिनोर झेलिएट, पौलिन कोलेंडा या भारताबाहेरील विदुषी भारतातील बहिष्कृत वर्गाचे वास्तव समोर आणत होत्या. जिथे बहुजनांची स्त्रियांची गणना शूद्रात केली गेली होती.  त्या बहिष्कृत बहुसंख्यांक भारतीय जनतेच्या योगदानाचा, त्यांच्या श्रमावर उभ्या राहिलेल्या अब्राह्मणवादी संस्कृती ब्राह्मणवादी पितृसत्तेच्या संघर्षाचे ऐतिहासिक, वर्तमान आकलन गेल ऑमव्हेट यांच्या लेखनात आढळते. तसेच शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, कष्टकरी उत्पादक जाती, हिंदुत्ववादाविरोधी दलित-बहुजन पर्यायी संस्कृती या संदर्भातील संपूर्ण जगभरात प्रकाशित होत असलेल्या पुस्तके, निबंध, प्रबंध यांची चिकित्सक समीक्षा इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली सारख्या मासिकातून सुमारे ७० च्या आसपास समीक्षापर लेख गेल यांनी लिहिलेले दिसतात.

वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड प्राध्यापकया डॉ.गेल ओम्वेट यांच्या इंग्रजी पुस्तकाचे नाव “Cultural Revolt in Colonial society in Non Brahmin movement  in western India  1873-1930” हे आहे. कॉ.पि.डी. दिघे यांनी १९८७  त्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. आणि १९९५ साली सुगावा प्रकाशनातर्फे ते पुस्तक मराठीत पहिल्यांदा प्रकाशित झाले. इंग्रजी पुस्तक सायंटिफिक सोशालिस्ट एज्युकेशन ट्रस्टयांच्या मार्फत प्रकाशित झाले होते. या पुस्तकात महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचा इतिहास आहे. त्याच्या चळवळीचा लेखाजोखा आहे. तो त्या कष्टकरी समाजासमोर आला. हे पुस्तक एका विशिष्ट कालखंडातील वस्तुस्थितीशी संबंधित माहितीचा खजिनाच आहे. वर्गवादी आणि वर्णवाद विरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रबोधन व्हावे आणि समतावादी चळवळीचा पाया मजबूत व्हावा हा त्याचा उद्देश आहे. त्या मोठ्या झाल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत हा त्याचा हेतू आहे. जात वर्ग विरोधी कार्यकर्त्यांसमोर एक प्रकारचा कष्टकऱ्यांचा जो वस्तुनिष्ठ इतिहास आहे तो समोर यावा असा एक प्रयत्न या पुस्तकाच्या भाषांतरामागे आपल्याला दिसतो. या पुस्तकांमध्ये त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे लाल निशाण पक्षाचे संस्थापक एस के लिमये, कॉ. यशवंत चव्हाण यांचाही सहभाग राहिला आहे.

१०७०-७१ मध्ये ऑमव्हेट यांनी सत्यशोधक चळवळीची दुर्मिळ कागदपत्रे गोळा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्या काळातील अनेक विचारवंत लेखक यांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्रातून आशिया आणि भारताच्या संदर्भामध्ये एकूण जो काही अभ्यास झालेला आहे, त्यात शेतकरी चळवळ, ब्राह्मणेतर आंबेडकरवादी चळवळी, वर्गवादी चळवळी आहेत. त्यांची मूळ साधने तपासत, त्याचा संदर्भ देत या अस्सल कागदपत्रांमधून हा विषय पुढे जातो. हा बहुजन समाजाचा कष्टकरी समाजाचा वेगळा इतिहास आहे.

त्या काळामध्ये श्रमिक मुक्ती दलासारखी संघटना काम करते. त्यानंतर मागोवा नावाचा ग्रुप जो अतिशय बुद्धिवादी आणि कठोर चिकित्सा करणारा होता. तो सुद्धा या पुस्तकाच्या प्रेरणेतून निर्माण झाला आहे असे आपल्याला दिसते.

मार्क्सवादानुसार वर्ग ही एकमेव शोषणाची व्यवस्था आहे पण अपारंपरिक मार्क्सवाद्यांनी बेसिक स्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चरही मांडणी खोडून काढली. मार्क्सवादाचा विस्तार केला. बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद याची मांडणी केली. वर्ग जाती प्रमाणेच पुरुष सत्ता ही बहुतेक शासनाची संस्था आहे असे त्यांनी मानले.

महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीने वासाहतिक समाजांतर्गत असणाऱ्या जातीय शोषणाचा प्रश्न पुढे रेटला आणि जनतेच्या लोकशाही आकांक्षांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला पण भारतातील मध्यमवर्गीय एक जाती गटातून आलेल्या कम्युनिस्ट नेत्यांनी या चळवळीशी सांधा जोडायच्या ऐवजी त्यांनी विरोध केला. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट चळवळीत येऊ शकणारा ब्राह्मणेत्तरांचा आणि दलितांचा गट चळवळीपासून फटकून राहिला त्या कारणांमुळे महाराष्ट्रात जागतिक चळवळ कमजोर राहिली. भारतीय परिस्थितीत वर्गाबरोबर जातीय शोषण हे महत्त्वाचे आहे. हा मुद्दा महाराष्ट्रातील कम्युनिस्ट नेत्यांनी लक्षात घेतला नाही असा त्यांच्या प्रतिपादनाचा रोख आहे. या पुस्तकानंतर कॉम्रेड डांगे, कॉम्रेड सरदेसाई, कॉम्रेड कोल्हटकर कॉम्रेड रणदिवे यांच्यावर जातीय अहंकारग्रस्त नेते म्हणून टीका होऊ लागली.

ह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीचा वारसा सांगून मार्क्सवादाचा विकास करण्याचा प्रयत्न डॉ.गेल ऑमव्हेट त्यांच्या संशोधनानंतर पुढे आला. नंतर बाबा आढाव याची सत्यशोधक कष्टकऱ्यांची चळवळ, डॉ. भारत पाटणकारांची श्रमिक मुक्ती दल’, इतर सत्यशोधक चळवळी यांनी या विचारानुसार चळवळी चालवल्या. डॉ.गेल ऑमव्हेट यांनी मार्क्सवादाचे भारतीयीकरण केले. मार्क्स आणि आंबेडकर आणि बुद्ध- तुकोबा अशी मांडणी केली.

धर्म-जातीसंघर्षाचे सूत्र सांगताना डॉ. आंबेडकर हे धर्म-जातीसंघर्ष हा अपरिहार्यपणे आर्थिक राजकीय सत्तासंघर्षाच्या दिशेने प्रवाहीत होतो हे दाखवून देतात. म्हणून जाती अंतासाठी त्यांनी सामाजिक-धर्मिक आर्थिक समग्र क्रांतीची आवश्यकता आहे, असे सांगितले आहे. जातीच्या उतरंडीत कोणती जात कोणाशी संघर्ष करते हे कळायला मार्ग नाही. जरी ब्राह्मण दलित (त्यांच्यातील पोटजातींची उतरंड लक्षात घेता) या टोकाच्या जातींना शोषक शोषित म्हटले तर मधल्या जाती, ज्या दोन्हींच्याही संपर्कात असतात, त्यांचे या दोन्ही जातींशी परस्परसंबंध येतात त्यांचे काय? या जाती शोषित म्हणायच्या की शोषक? ऑमव्हेट लिहितात : कोणत्याही शोषित गटाने काही मूलभूत प्रश्न विचारायचे असतात : आपले शोषक कोण? सर्व शोषितांना संघटित करून मुक्तीच्या दिशेने आपण कसे संघटन उभारणार? आणि शोषणाची संरचना तिचा शोषणमुक्तीच्या दिवाने वाटचाल करण्याच्या ऐतिहासिक शक्यतांशी नेमका संबंध काय?”

ऑमव्हेट या समाजशास्त्रीय चर्चाविश्वात जातीच्या प्रश्नाला अधोरेखित करणाऱ्या पहिल्या फळीच्या अभ्यासक विचारवंत आहेत, असे डॉ. योगेंद्रसिंग हे दाखवून देतात. दलितांच्या इतिहासावर संशोधन करण्याचा डॉ.गेल ऑमव्हेट यांनी मार्ग दाखविला. डॉ. गेल ऑमव्हेट यांनी सिद्धांताला व्यवहाराची जोड दिली वेळोवेळी वैचारिक स्थित्यंतर आणि सैद्धांतिक विकास केला. एका बाजूने हिंदुत्वाची चिकित्सा करताना आपली डावी विचारधारा सोडता जागतिकीकरणाबाबत त्या स्वागतशील भूमिका घेतात. जागतिकीकरणाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर डॉ.बालमुरली नटराजन यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

 डॉ. गेल ऑमव्हेट सक्रियपणे शेतकरी चळवळीत कार्यरत होत्या. त्यांच्यामुळे अनेकांना स्त्रीमुक्ती चळवळ चालविण्याची प्रेरणा मिळाली. स्वतः गेल यांनी परित्यक्ता, विधवा स्त्रियांच्या, जमीन घरांचे हक्कांसाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात विशेष कार्य केले आहे. पर्यावरण चळवळीत काम करताना त्यांनी भांडवलशाहीचा निसर्गावर होणार्या दुष्परिणामांविषयी महात्मा फुले यांच्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे.

 १९८० च्या दशकातील गेल यांचे काम टाळणे अशक्य आहे. आंबेडकरांचे विचार मुख्य धारेत येण्यापूर्वीच त्यांनी वाचले होते. त्यांचे महत्त्व जाणले होते. त्यांनी समकालीन दलित प्रश्नाबाबत आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता पाहण्यास मदत केली. त्यांच्यामुळेच  आंबेडकरांनाही प्रमुख विचारसरणीमध्ये संदर्भित करण्याचे कार्य केले. गेल्या अनेक दशकातील स्त्रिया दलित कामगारांचे राजकारण आणि त्यांच्या चळवळी समजून घेण्यात त्यांच्यामुळे मदत झाली.

  राजकीय चळवळ आणि वर्ग, जाती, लिंग यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव गेल  ऑमव्हेट यांनी  मांडला आहे. १९९० च्या दशकातील वैविध्यपूर्ण बहुजन आणि दलित सांस्कृतिक आणि राजकीयविश्व डॉ. गेल त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे मांडतात. डॉ.गेल ऑमव्हेट यांचे आयुष्य भारतीय समाजासाठी प्रतिबद्ध होते. त्यांच्या लिखाणाचा विचार करताना, जीन ड्रेझ, रोहिणी हेंसमन,शीला भल्ला आणि करोल उपाध्याय इत्यादींची नावे पुढे येतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विरोधाभासावरून ऑमव्हेट यांचा के. बालगोपाल यांच्याशी त्यांचा वादविवाद  झाला.

 ऑमव्हेट यांचा बुद्ध तत्वज्ञान आणि तुकारामांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास हा भारतीय तत्त्वज्ञानाची नवी ओळख करून देणारा आहे. सिकिंग बेगमपुरामधून असे दिसून येते की युरोपमध्ये प्रबोधन होण्यापूर्वीच भारतात पूर्वजांनी आधुनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे पुस्तक वाचल्यानंतर आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांनी बुद्ध धर्म आणि भारतीय इतिहास आणि समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि त्यावर मोठ्या प्रमाणात लिखाण केले. थॉमस पेनच्या विचारापासून महात्मा फुले प्रेरित झाले आणि महात्मा फुलेंपासून डॉ.गेल ऑमव्हेट प्रेरित झाल्या.

 

बहुन राष्ट्र निर्मितीसाठी झालेले ऐतिहासिक वर्तमानातील सांस्कृतिक संघर्ष, विविध जन आंदोलनं ज्ञान निर्मिती संदर्भातील बहुजनांचे योगदान याबाबत गेल यांनी केलेल्या लेखनाचे महत्व स्त्रीवाद्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जाती आणि वर्गाबाबत नेहमी लिंगाभावासह बोलले पाहिजे असे त्या म्हणत . नागरी हक्क आणि 1960 च्या डाव्या आणि स्त्रीवादी राजकारणामध्ये तिच्या विद्वानांसह असे स्कॉलर तिच्यासारखा आणखी एक विद्वान आणि विवेकी आणि क्षमतावान विचारवंत तयार करण्याची वेळ आता आली आहे.त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरील एलेनॉर झेलियटचे काम पुढे नेले आणि महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या आणि विचारांच्या संदर्भात त्याच्या एकेरीपणाकडे लक्ष वेधले.त्यांनी आम्हाला जातीला केवळ भौतिक बाब  आणि विचारधारा म्हणूनच  नव्हे तर भौतिक शक्ती म्हणून पाहण्यास प्रवृत्त केले. हा एक संवाद होता जो स्त्रीवाद्यांनी आणि डाव्यांनी पुढे नेला पाहिजे पण दुर्दैवाने आम्ही तिच्या विचारांच्या योग्यतेनुसार ते काम पुढे  घेऊन गेलो  नाही.

 डॉ.गेल ओम्वेट यांचे त्यांचे लेखन परिपूर्ण आहे, त्याला ज्याला जगाने मानले आहे. गेल ऑमव्हेट या महान विचारवंत वचनबद्ध आणि कटिबद्ध क्रांतिकारक होत्यात्यांच्यात बहुजनाप्रती  बुद्ध फुले आंबेडकर आणि येशू ख्रिस्तला पाहता येतेडॉ.गेल ऑमव्हेट सक्रीयपणे शेतकरी चळवळीत कार्यरत होत्या. त्यांच्यामुळे अनेकांना स्त्री मुक्ती चळवळ चालविण्याची प्रेरणा मिळाली स्वतःडॉ. गेल ओम्वेट  त्यांनी परित्यक्त्या विधवांच्या स्त्रियांच्या जमीन घरांचे हक्कांसाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात विशेष कार्य केले आहे पर्यावरणवादी चळवळीत काम करताना त्यांनी भांडवलशाहीचा निसर्गावर होणार्या दुष्परिणामांविषयी माणसाने फुले यांच्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. १९८० च्या दशकातील गेल यांचे विपुल काम टाळणे अशक्य आहे. आंबेडकरांचे विचार मुख्य धारेत येण्यापूर्वीच त्यांनी वाचले होते त्यांचे महत्त्व जाणले होते गेले आम्ही त्यांनी आपणाला समकालीन दलित प्रश्नांबाबत आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता पाहण्यास मदत केली गेली आम्ही यांनी आंबेडकरांनाही प्रमुख विचारसरणीमध्ये संदर्भित करण्याचे कार्य केले तर इतर राजकीय चळवळ आणि वर्ग जाती लिंग यांच्यावरील आंबेडकरी विचारांचा प्रभाव गेला भेट यांनी मांडला आहेगेल्या अनेक दशकातील स्त्रिया दलित कामगारांचे राजकारण आणि त्यांच्या चळवळी समजून घेण्यात त्यांनी आपणास मदत केली कॉ.बी.टी. रणदिवे यांच्याशी प्रतिवाद केला तर  अरुंधती रॉय यांच्या लेखनाची गेल यांनी केलेली टीका बऱ्याच लोकांना अस्वस्थ करते १९९० च्या दशकातील वैविध्यपूर्ण बहुजन आणि दलित  सांस्कृतिक आणि राजकीय विश्व गेल यांनी स्पष्टपणे मांडले आहे.

 भारतातल्या शोषितांची नेमकी अवस्था त्यांनी सखोल अभ्यासातून जगापुढे मांडली. त्यामुळे अनेक मुद्यांवर समाजालाही भान आले. आणि कार्यकर्त्यांनाही नेमकी भूमिका घेणे सोयीचे ठरले. प्रा. गेल ऑम्व्हेट यांनी भारतीय समाजाचा सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहास तपासला आहे. त्यांनी भारतातील सगळ्या विचारधारांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. समाजहिताचे नवे विचार मांडले आहेत. भारतातील जातीसंघर्ष धर्म संस्कृतीच्या परिघातही कार्यरत होतात. भारतामध्ये जात्योन्नतीच्या मार्गानेच वर्गोन्नती घडत राहिली. भारतामध्ये आधुनिकता जातीच्या पायानेच विस्तार पावल्यामुळे परिवर्तन, प्रबोधन, विकास, लोकशाही यांचा विस्तार जातीच्या आधारानेच होत राहिला, हे समजण्यासाठी प्रा. गेल ऑमव्हेट यांच्या योगदानातून आपणास यासंदर्भात अधिक स्पष्टता येण्यास मदत होते.

प्रा. सुरेंद्र जोंधळे म्हणतात, “डॉ.गेल ऑमव्हेट यांचे योगदान चिकित्सक मार्क्स, चिकित्सक आंबेडकर असे करण्यामध्ये आहे. म्हणजे आजच्या समाजामध्ये चिंतन, विश्लेषण हे प्रतिकूल आहे. संवेदनशील, प्रगतीशील, कृतिशील विचारांचा मागोवा आपण येथे घेणार असून हे फार मौलिक आहे. असे आहे, की आजच्या चर्चाविश्वामध्ये राष्ट्रवादाच्या कोणत्याही मुद्द्यांमध्ये चर्चा करता येऊ शकत नाही? आधुनिकतेची चर्चा करायची झाली झाली तरी ती करणे हे चुकीचे ठरत आहे, कठीण गोष्ट झाली आहे. लिहिताना प्रागतिकता वगैरे शब्दांचा सुद्धा अर्थ कसा घ्यायचा, याचा सुद्धा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर लोकशाही या शब्दाबद्दल सुद्धा काही बोलायचे झाले, तर ती कोणती लोकशाही? कोणाची लोकशाही? अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे डॉ. गेल यांचे मार्क्सवादी असणे, जाती आणि भारतातल्या वर्गाबद्दल बोलणे, दलित-शेतमजूर- स्त्रियांच्या बद्दल बोलणे आणि त्या बोलण्यावर आणि त्या लेखनावर आपण चर्चासत्र घेणे हे अतिशय चांगले आहे.

 गेलच्या वैचारिक योगदानाची चर्चा जर आपल्याला करायची झाली तर आपण मार्क्सवादाबद्दल बोलणार, आपण समाजवादाबद्दल बोलणार, आपण जात-वर्ग आणि त्यांच्या प्रश्नाबद्दल बोलणार, आपण क्रांतीबद्दल बोलणार, आपण या समोरच्या जगाकडे कसं पाहायचं? कोणत्या शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं? आणि हा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन हा मार्क्सवादी आंबेडकरवादी फुलेवादी दृष्टिकोन आहे का? असू शकतो का? याच्या बद्दल असा आग्रह व्यक्त करणे याची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे. अपरिहार्य आहे आणि याची चर्चा अतिशय सशक्तपणे केली आहे, त्याचा धांडोळा घेतला आहे हे महत्त्वाचे आहे. आज अनेक प्रश्न जगाच्या पाठीवर आहेत. युरोपमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये आहेत, भारतामध्येही आहेत आणि अशा वेळेस अशा गोष्टींचे वर्तमान कसं समजून घ्यायचं आणि विशेषतः भारतामध्ये ते कसं समजून घ्यायचे हा मुद्दा आहे. इथे जातीचे प्रश्न आहेत, वर्गाचे प्रश्न आहेत, लिंगभेदाचे प्रश्न आहेत तसेच गरिबीची प्रश्न आहेत, असमानतेचे आहेत, पाण्याचे, जमिनीचे आणि सामाजिक प्रतिष्ठा असे अनेक प्रश्न आहेत. हे सारे प्रश्न हे गेलच्या अभ्यासाचे, चिंतनाचे प्रश्न राहिले आहेत. हे प्रश्न केवळ त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे राहिले नाहीत तर ते प्रश्न संघर्षामधून, जनसमूहाच्या हालचालीमधून कसे सोडवता येतील याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला आहे.

 प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांचे इतिहासातील सैध्दांतिक कार्य समाजाचा तळगाळ पहाणारे आहे. यासाठी समाजशास्त्र, राज्यशास्त्र तत्वज्ञान या विद्याशाखांचे परिप्रेक्ष्य त्यांनी एकत्रित केल्यामुळे त्यांचे संशोधनकार्य आंतरविद्याशाखीय आहे. संशोधकांचा दृष्टीकोन प्रज्ञा, शील आणि करुणा यातून घडलेला असला पाहिजे. प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांच्याकडे हे सर्व आहे.

 ज्ञानसाधना प्राप्त करण्यासाठी डॉ. एलिनॉर झेलियट यांच्याप्रमाणे त्याची फलनिष्पती होइपर्यंत ऑमव्हेट आयुष्य वेचत होत्या. एलिनॉर झेलियटप्रमाणेच प्रा. डॉ. गेल ऑमव्हेट यांनी भारतीय संशोधकांना अनेक महत्वाची संशोधने दिली. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा उलगडा कसा करायचा आणि त्याचे विश्लेषण कसे करायचे यापेक्षाही तपश्चर्या नेमकी कशी करावी आणि त्यासाठी आपली संपूर्ण क्षमता कशी वापरावी हे त्यांच्याकडून शिकता येते.

 आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया ज्या पती पत्नीने घातला, ते म्हणजे जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. जोतिबाच्या प्रत्येक कृतीला सावित्रीची  साथ होती तर सावित्रीच्या प्रत्येक गोष्टीला जोतिबाची शाबासकीची थाप होती. अगदी तसचं डॉ गेल आणि डॉ भारत यांच्याबद्दल म्हणता येईल. मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून डॉ गेल आणि डॉ भारत पाटणकर यांनी आपले आयुष्य वेचले. सावित्री-जोतिबा यांच्याप्रमाणे परस्परांना समजून घेत समाज बदलाची चळवळ नेटाने सुरु ठेवली. कठीण प्रसंगामध्ये परस्परांना साथ दिली. हे पाटणकर यांच्या सखीया कविता संग्रहातुनही दिसते. आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली नऊ दहा जिल्ह्यांमध्ये कष्टक-याची चळवळ उभी आहे, त्या पाठीमागे डॉ गेल यांचे योगदान खुपच मोठे आहे. डॉ गेल यांचे संशोधन, त्यांचे लिखाण, त्यांचा कष्टक-यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातुन केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढी समोर त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. परंतु इतके असूनही  डॉ.गेल ऑमव्हेट यांनी स्वतःच्या लेखनाची त्यांनी कधीच जाहिरात केली नाही.

गेल ऑमव्हेट आणि भारत पाटणकर. प्राची पाटणकर यांच्या फेसबुक वॉलवरुण साभार.


डॉ. भारत पाटणकर यांच्या ऑमव्हेट यांच्याविषयीच्या कवितांमधून प्रेमातल्या रोमांचकारी भावनांचा, समृद्ध सामाजिक जाणिवांचा आणि परिवर्तनाचा ध्यास याचा प्रत्यय येतो.

 

डॉ.भारत पाटणकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात ,

 

सखी

 

आषाढातल्या वीजेसारखी आलीस लवलवत

दुथडी भरून वाहणार्या नदीसारखी आलीस

मी ही आलो कृष्णा-कोयनेच्या महापूरासारखा

आपण हातात हात घालून

वादळ झालो

एकाच वेळी व्यक्ती आणि समष्टी

बुद्ध अनुचरून चारिका केली

पायांना भिंगरी बांधून

तीन पिढ्यांचा वारसा दिला

चौथ्या पिढीला

मानव मुक्तीचा ….. नव्या सूर्योदयाकडे जाणारा

आता तू चाललीस हरवत स्वतःला

माझ्या हाती देवून हात घट्ट

आपला प्रवास आता चालला

समष्टीत पूर्ण विलीन होण्याकडे

इतिहासातून, विचारातून, पुस्तकातून, आठवणीतून जीवंत राहण्याकडे

चल सखी…. या संध्याकाळी आता

प्रेमाची गाणी गाऊ.

भारताच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीला समर्पित केलेले जीवन म्हणजे डॉ. गेल ऑमव्हेट यांचे जीवन आणि कार्य होय.

त्यांना अखेरचा जय भीम आणि अभिवादन!

लेखक - प्रा. संजयकुमार कांबळे, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लिंगभाव आणि स्त्रीअभ्यासविभागात प्राध्यापक आहेत.


मूळ लेख 

 

 


Monday, 30 August 2021

भारत ‘राष्ट्र’ होते काय?


 

आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने भारत कधीच राष्ट्र नव्हते. सांस्कृतिक दृष्टीने भारताच्या सीमा पार अफगाणिस्तान, थायलंड, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंकेपर्यंत पोहोचत असल्याचा विश्वास बाळगला तरी ब्रिटिशांनी या ‘बृहत् भारता’च्या केलेल्या मांडणीचे वास्तव स्वीकारावेच लागेल, किंबहुना भारत एकसंध करण्याचे त्यांचे हे कार्य भारतीयत्वासाठी वरदान ठरले.

भारतात अनेक धर्माचे, पंथांचे, जाती-जमातींचे, भाषांचे लोकसमूह राहात असून, भारत एक ‘राष्ट्र’ नाही, हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा आरोप भारतीयांसाठी अपमानास्पद होता. भारतीय नेते आग्रहाने मांडू लागले, की आमच्यात कितीही विविधता वा परस्परविरोध असला तरी भारत हे सांस्कृतिक दृष्टीने एक राष्ट्रच आहे. एवढेच नव्हे, तर ब्रिटिशांच्या कितीतरी आधीपासून हे राष्ट्र जगाच्या पाठीवर नांदत आहे. यासाठी त्यांनी वेदकाळापासूनचा इतिहास सांगायला सुरुवात केली. वेद, उपनिषदे, स्मृती, महाभारत, पुराणे यांत ‘राष्ट्र’ शब्द कसा आला आहे, याचे दाखले ते देऊ लागले. या सांस्कृतिक बृहत् भारताचे क्षेत्रही एवढे विशाल होते, की त्यात गांधार (अफगाणिस्तान), सयाम (थायलंड), चंपा (व्हिएतनाम), कंबुज (कंबोडिया), जावा, सुमात्रा, बाली, मलाया, फिलिपाईन्स असे अनेक देश होते. एवढेच नाही तर आपली भारतीय संस्कृती किती दूरवर पोहोचली होती यासाठी जपान, चीन, मंगोलिया, इराक, इराण, तुर्कस्तान, इत्यादी देशांचा किंवा आफ्रिका, दक्षिण अमेरिका या भागांचा उल्लेख करताना आजही आपला ऊर भरून येत असतो.

स्वातंत्र्य मिळतेवेळी आपला हाच दावा होता, की  प्राचीन काळापासून भारत हे सांस्कृतिक दृष्टीने एक राष्ट्र राहात असल्यामुळे त्याची फाळणी होता कामा नये. वस्तुत: त्यांना पाहिजे असलेला अखंड भारत व प्राचीन सांस्कृतिक भारत एकरूप नव्हता. त्यांना पाहिजे असणारा अखंड भारत म्हणजे सत्तांतराच्या वेळी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेला व त्यांनी एकसंध केलेला ब्रिटिश भारत होय. यात वर उल्लेख केलेले देश येतच नव्हते. यापैकी अफगाणिस्तानवर अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारतीयांचे (शिखांचे) राज्य होते. १९१९पर्यंत या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्याचा कारभार दिल्लीहून चालत असे. परंतु, १९१९ साली ब्रिटिशांनी अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य मान्य केले व तो देश भारतापासून वेगळा झाला. १९०५ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली तेव्हा ती रद्द करण्यासाठी भारतीयांनी उग्र आंदोलन केले व नंतर ती रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. मात्र पूर्वी सांस्कृतिक भारताचा भाग असलेला अफगाणिस्तान १९१९ साली भारतापासून वेगळा झाला त्याबद्दल आंदोलन तर सोडाच, पण कोणाला सुख-दु:खही वाटले नाही. परंतु अफगाणिस्तानचा भाग असलेला वायव्य सरहद्द प्रांत, डय़ुरंट रेषा आखून संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटिशांनी आपल्याकडे म्हणजे भारताकडे ठेवून घेतला व १९४७ पर्यंत त्यांच्याकडे राहिल्यामुळे अखंड भारताच्या संकल्पनेत समाविष्ट झाला.

बौद्धधर्मीय ब्रह्मदेश किंवा श्रीरामाची श्रीलंका हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रदेश आधी ब्रिटिश साम्राज्याचे भाग होते. पण १९३५च्या कायद्यानुसार त्यांना भारतापासून वेगळे करण्यात आले व त्यामुळे १९४७ ला ते ब्रिटिश भारताचा भाग राहिले नव्हते. त्यामुळे ते अखंड भारताचा भाग मानले गेले नाहीत. सांस्कृतिक भारताचा भाग असल्यामुळे हे भाग उपखंड भारतात समाविष्ट करावेत अशी कट्टर अखंड भारतवाद्यांनीही मागणी केली नाही.

आज भारताचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनलेला अंदमान-निकोबार द्वीपसमूह प्राचीन भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. या द्वीपसमूहावर ब्रिटिशांचे आधिपत्य असल्यामुळे १९४७ला सत्तांतर करताना तो भारताकडे हस्तांतरित झाला. म्हणजे सांस्कृतिक भारताचा भाग नसलेला हा भूप्रदेश नव्याने भारताला लाभला व भारतीयत्वाचा भाग बनला.

आज भारताचा जेवढा भाग एक राष्ट्र म्हणून एका राज्यघटनेखाली आहे तेवढा १९४७ पूर्वी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली नव्हता. भारताचे दोन भाग होते. एक- १२ प्रांतांचा ब्रिटिश भारत व दोन- ५६५ स्वायत्त राज्यांचा संस्थानी भारत. सुमारे ७५ टक्के भूभाग असणाऱ्या ब्रिटिश भारतावर त्यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे फक्त या ब्रिटिश भारतालाच लागू असत. एका कायद्याखाली व प्रशासनाखाली एकसंध करण्यात आलेल्या या ब्रिटिश भारताची १९४७ला दोन देशांत विभागणी करण्यात आली. उर्वरित २५ टक्के भूभाग असणाऱ्या संस्थानी भारतावर ब्रिटिशांचे आधिपत्य नव्हते. त्यामुळे तो या फाळणीच्या योजनेत येत नव्हता. किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे या संस्थानी भारताची ५६५ भागांत आधीपासूनच फाळणी झालेली होती.

हा संस्थानी भारत राजे, महाराजे, नवाब, निजाम यांचा बनलेला होता. ब्रिटिशांचे भारतावर राज्य येण्याआधीपासूनच ते आपापल्या प्रदेशात स्वायत्तपणे राज्य करीत होते. त्यांच्याशी ब्रिटिश सरकारने राजकीय करार केलेले होते व त्या करारांच्या मर्यादेत ब्रिटिश सरकारला संस्थानांसंबंधात अधिकार प्राप्त झाले होते. ते अधिकार सार्वभौमत्वाचे नव्हते तर करारजन्य होते. ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे संस्थानांना लागू होत नसत. ते करार वैयक्तिक स्वरूपाचे व परस्परविश्वासाने केलेले असल्यामुळे करार कायद्यानुसार अहस्तांतरणीय होते. सत्तांतराच्या वेळी ब्रिटिश सरकारने हे करार रद्द करून टाकल्याची घोषणा केली. त्यामुळे ती संस्थाने करारपूर्व कायद्याप्रमाणे स्वतंत्र झाली. ब्रिटिश प्रांताप्रमाणे त्यांची फाळणी होऊ शकली नाही. निर्माण होणाऱ्या दोन देशांपैकी कोणात विलीन व्हावे या वा त्यांच्याशी कोणते करार करावेत वा स्वतंत्र राहावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक संस्थानाला प्राप्त झाला होता.

भारतीय नेत्यांचे म्हणणे होते, की प्राचीन काळापासून संस्थानांसहित सारा भारत एक सांस्कृतिक राष्ट्र असल्यामुळे या संस्थानांसंबंधात ब्रिटिश सरकारकडे असलेले सर्व अधिकार स्वतंत्र भारताकडे हस्तांतरित झाले पाहिजेत, पण असे करणे कायद्याविरुद्ध झाले असते म्हणून सरकारने मान्य केले नाही. सत्तांतर हे पार्लमेंटमध्ये कायदा करून झालेले असल्यामुळे संस्थानांचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने सुटणे आवश्यक होते. त्यामुळे स्वतंत्र भारत सरकारपुढे प्रत्येक संस्थानाशी नव्याने करार करण्याचे आव्हान उभे ठाकले. यालाच संस्थानांच्या विलीनीकरणाची समस्या म्हणतात. मोठय़ा राजकीय कौशल्याने व महत्प्रयासाने त्यांना भारतात विलीन करून घेण्यात भारत सरकारला यश मिळाले. या अद्भुत यशाची कहाणी मोठी बोधप्रद असून, त्या यशाचे मुख्य कारण प्राचीन काळापासूनची भारताची सांस्कृतिक एकता हेच होते.

प्राचीन काळापासून भारत सांस्कृतिक दृष्टीने एक होता, पण आज आपण ज्यास ‘राष्ट्र’ म्हणतो त्या अर्थाने राष्ट्र नव्हते. आजच्याप्रमाणे सर्व भारत एका राज्यसत्तेखाली कधीही नव्हता. सर्व भारताचा एक राजा, एक कायदा, एक सैन्य, एक प्रशासन असे कधीच नव्हते. असे राजकीय ऐक्य नसेल तर केवळ सांस्कृतिक ऐक्य असून काय उपयोग? प्राचीन सांस्कृतिक बृहत् भारतात वेळोवेळी अनेक स्वतंत्र राज्ये नांदत होती. या सर्वाचे मिळून त्या काळात एक राष्ट्र होते असे मानायचे, तर त्या सर्व बृहत् भारताचे मिळून आजही एक राष्ट्र आहे असे मानायला काय हरकत आहे? तसेच भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांचे मिळून आजही एक राष्ट्र आहे, असे मानायला व फाळणीबद्दल उगाच दु:ख मानून न घ्यायला काय हरकत आहे?

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांत धर्मभेद, पंथभेद, जातिभेद वगैरे निर्माण करून त्यांची एकराष्ट्रीयत्वाची भावना नष्ट केली हा आरोप खरा नसून, उलट त्यांच्यामुळेच जास्तीत जास्त भारत एकराष्ट्रीय झाला. आपण एकराष्ट्रीय आहोत ही जाणीव भारतीयांत निर्माण झाली. भारताला एकराष्ट्र बनवावे, ही प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली.

या दृष्टीने त्यांनी येथे राज्य स्थापन केल्यावर एकराष्ट्रीयत्वासाठी अडथळे असणारी भारतीय संस्थाने खालसा करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्या वेळेस भारतात एकूण किती संस्थाने होती याची संख्या माहीत नाही. एवढे माहीत आहे, की १९४७ला २५ टक्के भूभागात ५६५ संस्थाने शिल्लक होती. त्यांनी खालसा केलेली संस्थाने याच्या तिप्पट असू शकतील. प्रत्येकाचा वेगळा राजा, कायदा, सैन्य, प्रशासन असे. सर्व भारताचे एक राज्य नसल्यामुळेच तर भारत वारंवार परकीय आक्रमणाचा बळी पडत आला. ब्रिटिशांनी विविध कारणे सांगून ही संस्थाने खालसा करून ब्रिटिश भारतात विलीन करून टाकली. भारत एकसंध करण्याचे त्यांचे हे कार्य भारतीयत्वासाठी वरदान ठरले.

भारतातील सारी संस्थाने खालसा करून सर्व भारतच त्यांनी एकसंध केला असता, पण १८५७चा उठाव झाला नि त्यांनी हे कार्य नंतर सोडून दिले. हा उठाव झाला नसता तर १९४७ला संस्थानांचा प्रश्नच शिल्लक राहिला नसता. पण सुदैव असे, की शीख, राजपूत, मराठे, नेपाळचा हिंदू राजा यांनी ब्रिटिशांचा पक्ष घेऊन हा उठाव मोडून काढला व १९४७ला अखंड भारताच्या मागणीसाठी ब्रिटिश भारत शाबूत राहिला. लोकशाही व आधुनिक राष्ट्र या संकल्पनांचा भारतात उदय झाला!

तेव्हा भारत पूर्वी ‘राष्ट्र’ होते हे खरे नसून, ब्रिटिश राज्यामुळे आपल्याला राष्ट्र बनण्याची प्रेरणा मिळाली. या दृष्टीने ब्रिटिश राज्य भारतासाठी इष्टापत्ती ठरले. अर्थात, मुळात सांस्कृतिक ऐक्य असल्यामुळेच भारतीयांत एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकली, भारत एक ‘राष्ट्र’ बनू शकले!

लेखक  - शेषराव मोरे 

हे इतिहासाचे अभ्यासक आहेत.

मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिंक कॉपी करून ब्राउजर वर पेस्ट करा.. 

https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/article-on-history-of-india-1191864/

Friday, 23 July 2021

‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत

  

Illustration by RAmandeep Kaur in The Print


नवी दिल्लीः २३ ऑक्टोबर २०१८च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना पदावरून तडकाफडकी हटवले होते. त्या रात्रीनंतर एका अज्ञात भारतीय संस्थेने जी पिगॅसस स्पायवेअरची ग्राहक असू शकते त्यांनी वर्मा यांच्याशी संबंधित तीन मोबाइल क्रमांक पाळत करण्यासाठी निश्चित केले.

वर्मा जोपर्यंत तडकाफडकी हटवले जात नव्हते तोपर्यंत ते त्यांच्या अधिकारात व कायद्याच्या चौकटीत काहींवर नजर ठेवून होते पण त्यांच्या गच्छंतीनंतर त्यांच्यावरही पाळत सुरू झाली आहे, याची खबरबात त्यांना लागली नव्हती.

आलोक वर्मा यांची पदावरून गच्छंती झाली तेव्हा त्यांचा मोबाइल क्रमांक पेगॅससच्या रडारवर निश्चित करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित अन्य १० मोबाइल क्रमांकही पेगॅसस स्पायवेअरसाठी निश्चित करण्यात आले. या १० मोबाइल क्रमांकापैकी ८ मोबाइल क्रमांकाचे अमनेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने फोरेन्सिक परिक्षण केले असता या क्रमांकात पिगॅसस स्पायवेअरने शिरकाव केला होता, तर अन्य दोन क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.

वर्मा यांच्या फोनसहित त्यांची पत्नी, मुलगी व जावई यांचेही क्रमांक या यादीत होते. वर्मा यांच्या कुटुंबातील ८ क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित होते, असे द वायरला आढळून आले आहे.

वर्मा यांच्या व्यतिरिक्त सीबीआयतील दोन वरिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना व ए. के. शर्मा यांचेही मोबाइल क्रमांक पिगॅससच्या डेटाबेसमध्ये आढळून आले आहेत.

२३ ऑक्टोबर २०१८मध्ये सीबीआयमध्ये असलेल्या राकेश अस्थाना यांनाही हटवण्यात आले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक आहेत. तर ए. के. शर्मा जानेवारी २०१९ पर्यंत सीबीआयमध्ये होते. नंतर त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.

पिगॅसस स्पायवेअर डेटाबेसमध्ये अस्थाना, शर्मा, वर्मा व त्यांच्या कुटुंबियांतील काही नातेवाईकांचे क्रमांक काही काळापुरते निश्चित करण्यात आले होते.

वर्मा यांनी फोरेन्सिकसाठी तयारी दाखवली नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये पिगॅसस स्पायवेअरने शिरकाव केला की नाही याची माहिती मिळू शकत नाही.

सीबीआयमधील साठमारी

आलोक वर्मा व अस्थाना यांच्यात ज्येष्ठतेवरून सीबीआयमध्ये साठमारी सुरू होती. यात सीबीआयचे विशेष महासंचालकपदी असलेल्या अस्थाना यांच्यावर सीबीआयचे महासंचालक असणार्या वर्मा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोप करत एक फौजदारी गुन्हा दाखल केला आणि तेव्हा हा वाद पेटला.

२१ ऑक्टोबर २०१८मध्ये हा गुन्हा नोंदला गेला. त्या नंतर दोन दिवसांनी वर्मा यांनी अस्थाना यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार नोंद केली. त्यानंतर दिल्लीत हालचाली सुरू झाल्या. अस्थाना हे पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटचे समजले जात होते. अशा परिस्थितीत अस्थाना यांच्यावरच वर्मा यांनी गुन्हा दाखल केल्याने प्रशासनात खळबळ माजली होती. त्यात सीबीआयने राफेल विमान घोटाळ्याची फौजदारी चौकशी करावी अशी विरोधकांनी केलेली मागणीही वर्मा यांनी फेटाळली नव्हती.

वर्मा यांच्या गच्छंती अगोदर तीन आठवड्यापूर्वी ४ ऑक्टोबरला ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण व माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी वर्मा यांची सीबीआय कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याकडे राफेल विमान घोटाळ्याची चौकशी करावी अशी तक्रार दिली. या भेटीवर सरकार नाराज होते.

त्या संदर्भातील वृत्त सर्वत्र आल्याने सरकारची पंचाईत झाली होती. या संदर्भात द वायरने शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राफेलची फाइल सीबीआयकडे असल्याची कबुली दिली होती पण ही फाईल आपण पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

इकडे सीबीआयने राफेलची चौकशी सुरू केली नसली तरी सीबीआय पुढे मागे सरकारला गोत्यात आणू शकते याचा धोका पीएमओला लक्षात आला होता. या दरम्यान वर्मा यांची सरकारने मध्यरात्री गच्छंती केली. त्यांची एका रात्रीत केलेली गच्छंती व त्यानंतर त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर पिगॅससमार्फत ठेवलेली पाळत बरेच काही सांगून जाते.

पुढे वर्मा यांनी ३१ जानेवारी २०१९ मध्ये भारतीय पोलिस सेवेतून निवृत्ती पत्करली. पिगॅससचा जो डेटाबेस उघडकीस आला आहे, त्यानुसार निवृत्तीच्या दिवसानंतर त्यांचे महत्त्व उरले नाही.

https://marathi.thewire.in/pegasus-project-chronology-samajhiye-hours-after-midnight-coup-cbi-chiefs-phones-entered-surveillance-zone

मूळ बातमी

Saturday, 6 July 2019

तुम्ही फॅसिस्ट राजवटीत राहत आहात हे कसे ओळखाल?




द वायर मराठी 
1 जुलै 2019 
रोहित कुमार 

तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी २५ जून रोजी संसदेतल्या त्यांच्या पहिल्यावहिल्याघणाघाती भाषणातसरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचे ते भाषण राजकारणातल्या त्या एका त्रासदायक शब्दाभोवती केंद्रित होते : फॅसिझम. “आज देशामध्ये फॅसिझमची सर्व सुरुवातीची चिन्हे दिसू लागली आहेत,” असा त्यांचा मुद्दा होता.

असे म्हटले जाते की फॅसिझमची व्याख्या करणे म्हणजे प्रेमात असण्याची अचूक व्याख्या करण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. तुम्ही असता तेव्हा तुम्हाला ते माहीत असते, पण त्याची व्याख्या करायला सांगितले तर अचूक शब्दयोजना करणे हे एक आव्हान असते.

काहीजणांचा असा आग्रह असतो की २० व्या शतकाच्या सुरुवातीला मुसोलिनी आणि त्याचा Partito Nazionale Fascista किंवा राष्ट्रवादी फॅसिस्ट पक्ष यांचे जे सरकार होते त्याचे वर्णन करतानाच केवळ फॅसिझम हा शब्द वापरायला हवा, तर इतर काही जण जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या अधिकारवादी सरकारसाठी हा शब्द वापरतात.
मात्र फॅसिझमची काही ठराविक गुणवैशिष्ट्ये असतात ज्यांच्याबाबत राजकीय इतिहास आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांचे एकमत आहे, आणि लोकशाहीमधील नागरिकांनी या ठराविक वैशिष्ट्यांची ओळख करून घेतली पाहिजे.
अतिरेकी राष्ट्रवाद
How Fascism Works, या आपल्या पुस्तकामध्ये, येल विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणारे जेसन स्टॅनले यांनी फॅसिझमची व्याख्या करताना म्हटले आहे, “तो अतिरेकी राष्ट्रवाद असतो. हा राष्ट्रवाद कधी वंशवादी असतो, धार्मिक असतो किंवा सांस्कृतिक. एक अधिकारवादी नेता संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतो, आणि तोच देशाच्या वतीने बोलतो.” कामचलाऊ व्याख्यांमध्ये ही व्याख्या सर्वात चांगली आहे.
फॅसिझमची व्याख्या करणारे एक वैशिष्ट्य म्हणजे तो राष्ट्रीय अस्मितेला इतर सर्व अस्मितांच्या वर मानतो. राष्ट्रवादाचा अतिरेक म्हणजे फॅसिझम! राष्ट्रवाद आपल्याला आपला देश अनन्य आहे आणि आपले त्याच्याप्रती एक विशेष उत्तरदायित्व आहे असे सांगतो, तर फॅसिझम सांगतो आपला देश हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण पूर्णपणे त्यालाच उत्तरदायी आहोत.
सरकारमधले लोक जर सतत राष्ट्रवादावर जोर देत असतील आणिवारंवार युद्धखोर राष्ट्रवादी घोषणा देत असतील तर ती फॅसिझम अवतरल्याची खात्रीशीर चिन्हे असतात.
लेखक युवाल नोहा हरारी यांनी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा लोक जीवन गुंतागुंतीचे असते याकडे दुर्लक्ष करतात आणि ते अतीसोपे करू पाहतात, तेव्हा फॅसिझम जन्म घेतो. फॅसिझम गोष्टींकडे काळ्यापांढऱ्या स्वरूपात पाहतो, चांगल्या आणि वाईट, गटातले आणि गटाबाहेरचे, आणि अर्थातच देशभक्त आणि देशद्रोही.
एक कल्पित भूतकाळ
फॅसिस्ट कथन नेहमीच एका कल्पित, सोनेरी भूतकाळावर आधारित असते. एक वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र असा काल्पनिक काळ, ज्याचा बाहेरच्या आक्रमकांमुळे किंवा आतल्या भ्रष्ट लोकांमुळे दुर्दैवी अंत झाला. फॅसिस्ट सरकारे ही नेहमीच भूतकाळातील त्या गौरवशाली संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचे वचन देऊन सत्तेवर येतात. (योगायोगाने, ती संस्कृती उतरंड असलेली पुरुषप्रधान संस्कृती होती, जिथे शक्तिशाली, शूर पुरुष मेहनत करत आणि युद्धे लढत आणि कर्तव्यतत्पर, आज्ञाधारक स्त्रिया घरी राहून पुढची पिढी घडवत.)
नेपल्स येथे १९२२ साली झालेल्या फॅसिस्ट काँग्रेसमध्ये बोलताना बेनिटो मुसोलिनीने स्वतःच हा सोनेरी भूतकाळ काल्पनिक असल्याचे कबूल केले होते:
“आपण आपले मिथक तयार केले आहे. हे मिथक एक श्रद्धा आहे, एक तळमळ आहे. ते वास्तव असण्याची गरज नाही..आपले मिथक आपला देश आहे, आपले मिथक त्या देशाची महानता आहे! ते मिथक, ती महानता आपल्याला संपूर्ण वास्तवात उतरवायची आहे. आणि त्यासाठी आपण आपले सर्वस्व अर्पण करत आहोत.”
वर्तमान फॅसिस्ट कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक भावना आणि गतजीवनाबद्दलची ओढ जागविणे हे या काल्पनिक भूतकाळाचे कार्य आहे. नाझी विचारवंत अल्फ्रेड रोझेनबर्ग यांनी १९२४ मध्ये असेच लिहिले होते, “आपला स्वतःचा पौराणिक भूतकाळ जाणून घेणे आणि त्याचा आदर करणे… पुढच्या पिढीनेयुरोपच्या मूळ निवासस्थानाच्या मातीशी घट्ट नाळ जोडावी यासाठीची ही पहिली अट असेल.”
महान नेता
प्रत्येक फॅसिस्ट सरकारच्या केंद्रस्थानी असतो एक महान नेता, जो पितृसत्ताक कुटुंबाचा प्रमुख किंवा पुरुषी सत्तेचा वाहक असतो. जेसन स्टॅनले यांच्या मते फॅसिस्ट चळवळी एवढ्या ठामपणे पुरुषप्रधानतेचा पुरस्कार करतात याचे कारण म्हणजे देशाचा नेता हा पारंपरिक पितृसत्ताक कुटुंबातील पित्यासमान असतो.
अशा रीतीने हा नेता देशाचा “पिता” बनतो. त्याची ताकद आणि सत्ता हे त्याच्या कायदेशीर अधिकाराचा स्रोत बनतात, अगदी पितृसत्ताक कुटुंबामध्ये पित्याची ताकद आणि सत्ता हे त्याची मुले व पत्नीवरील त्याच्या सर्वोच्च नैतिक अधिकाराचे स्रोत असतात तसेच! नेता त्याच्या देशाचे पालनपोषण करण्याचे वचन देतो, अगदी जसे पारंपरिक कुटुंबातील पित्याप्रमाणेच! तो त्यांना कोणत्याही दुखापतीपासून वाचवण्याचेही वचन देतो.
देशाचा भूतकाळ पितृसत्ताक कौटुंबिक संरचनेप्रमाणे दाखवल्याने, फॅसिस्ट सरकारांकरिता सत्तेच्या उतरंड असलेल्या, अधिकारवादी आणि विषमतावादी संरचना स्थापित करणे सोपे जाते.
फॅसिस्ट प्रथम समाजाला गटातले आणि गटाच्या बाहेरचे असे विभाजित करून आणि नंतर बाहेरच्यांना दुष्ट शत्रू म्हणून दाखवून सत्तेवर येतात. त्यांचा नेता हा बाहेरच्यांबद्दल भीती निर्माण करण्यात आणि केवळ तो एकटाच आतल्यांचे रक्षण करू शकतो असे चित्र निर्माण करण्यात विशेष तरबेज असतो (बाहेरचा गट हा खूप लहान असतो आणि खरे तर आतल्या गटाला त्याच्यापासून कोणतीही वास्तव भीती नसतेही गोष्ट अलाहिदा).
वास्तवाची पुनर्व्याख्या करणे
भूतकाळाचे मिथकीकरण करण्याबरोबरच फॅसिस्ट सरकार हे वर्तमान वास्तवाचीही पुनर्व्याख्या करण्यासाठी लक्षणीय प्रमाणात कष्ट आणि संसाधने खर्च करते. ते लोकशाहीच्या संस्थांना केवळ त्यांच्याबद्दलच्या विश्वासाला सुरुंग लावून पोकळ करते, कारण एकदा का विश्वसनीयतेच्या सर्व यंत्रणा नष्ट झाल्या की मग तुम्ही कुणावर विश्वास ठेवणार?मग तुमच्यासमोर केवळ एकच व्यक्ती उरते, ती म्हणजे वास्तवाची व्याख्या करणारी एकमेव व्यक्ती – महान नेता! या नेत्याला वास्तवाचा एकमेव स्रोत म्हणून स्थापित करणेहे फॅसिस्ट शासनामध्ये प्रचाराचे ध्येय असते. देश जितका फॅसिझमच्या पकडीत येत जाईल तितका याच नेत्याचा चेहरा सगळीकडे दिसू लागेल.
या बिंदूवर, आता हा नेता अक्षरशःकाहीही बोलला तरी चालते. मात्र रोचक गोष्ट अशी की याचा अर्थ लोक त्याच्यावर खरोखर विश्वास ठेवतात असे नाही. उदाहरणार्थ व्लादिमीर पुतीन सत्याची ऐशीतैशी करण्यासाठी प्रसिद्धच आहेत. आणि तरीही रशियातील लोकांमध्ये त्यांना अभूतपूर्व अशी मान्यता आहे. ते खोटे बोलत आहेत हे लोकांना कळते पण ते सोडून देतात, कारण मनातल्या मनात त्यांना वाटते की ते कुठेतरी खोलवर सत्यच सांगत आहेत – रशियन लोकांच्या ‘गौरवा’चे सत्य. एखादा अधिकारवादी नेता जोपर्यंत लोकांना आवडणाऱ्या मूल्यांबद्दल बोलत असतो तोपर्यंत तो सत्य सांगत आहे की नाही हे फारसे महत्त्वाचे ठरत नाही.
बुद्धिवादावर हल्ला करणे
कपोलकल्पित कथा आणि मिथ्या प्रचाराच्या जोरावर सत्तेवर आलेले सरकार विद्यापीठे आणि समीक्षात्मक विचारांचा पुरस्कार करणाऱ्या इतर संस्थांवर विशेषकरून हल्ले चढवेल यात आश्चर्याची गोष्ट नाही. विरोध करणाऱ्या स्वतंत्र आणि मुक्तविचारी आवाजांना थारा देणाऱ्या संस्थांची विश्वसनीयता ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांच्या जागी लाचार प्रसारमाध्यमे आणि संस्थांना आणण्यासाठी फॅसिस्ट सरकारे आटापिटा करतात.
उदाहरणार्थ, तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कस्तानातील विद्यापीठांमधील पाचहजार विचारवंतांना लोकशाहीवादी किंवा डावे विचार असल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकले आणि तुरुंगात टाकले. यापैकी एक विचारवंत, राज्यशास्त्राचे प्राध्यापक इस्मत आका म्हणाले, “काढले जाणारे हे लोक केवळ लोकशाहीवादी डावे लोक नाहीत, ते खूप चांगले शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत. त्यांना काढून टाकून सरकार उच्च शिक्षणाच्या कल्पनेवरच, या देशात विद्यापीठे असण्याच्या कल्पनेवरच हल्ले करत आहे.”
फॅसिझम नैपुण्याची खिल्ली उडवते, तज्ञांना कोणतीही किंमत देत नाही. उदारमतवादी लोकशाहींमध्ये, राजकीय नेत्यांनी केवळ ते ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्याच लोकांचा नव्हे तर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा आणि शास्त्रज्ञांचाही सल्ला घेणे अपेक्षित असते. पण फॅसिस्ट नेते अपरिहार्यपणे स्वतःला आपणच “कृती करणारे लोक” आहोत असे समजते, ज्यांना कुणाचा सल्ला घेण्याचा किंवा विचार-विमर्श करण्याचा काहीही उपयोग नसतो.
१९४२ साली एका निबंधामध्ये फ्रेंट फॅसिस्ट लेखक पियरे दरियू ला रोशेल यांनी लिहिले, “(फॅसिस्ट) म्हणजे संस्कृती नाकारणारा… तो कल्पनांवर विश्वास ठेवत नाही, आणि म्हणून सिद्धांत नाकारतो. तो कृतीवर विश्वास ठेवतो आणि एका धूसर मिथकाशी सुसंगत कृती करतो.”
फॅसिस्ट सरकारचे नियंत्रण प्रस्थापित होईपर्यंत आपण निःशंकपणे असे म्हणू शकतो की त्या सरकारला सत्तेवर आणलेल्या निवडणुका विवेकावर नव्हे तर भावनांवर लढल्या गेल्या, कारण एकदा का परिणामकारकरित्या या भावनांवर ताबा घेतला गेला की मग व्यावहारिक पातळीवर लोकशाही म्हणजे केवळ एक भावनांच्या आधारे चालणारा भावनांचा खेळच बनते.
हरारी लिहितात तसे, फॅसिस्ट आपल्या ईमेल्स आणि फोन कॉल्स हॅक करतात त्याहीपेक्षा जास्त आपल्या भीती, तिरस्कार आणि अभिमान या भावना हॅक करतात. ते त्यानंतर या भावनांचा वापर करतात, जी त्यांच्या हातातली शस्त्रे बनतात आणि आतूनच लोकशाही उद्ध्वस्त करतात.
हे माहीत होणे आणि समजणे हा कदाचित फॅसिझमचा संसर्ग झालेल्या समाजाकरिता मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. जर समाजातील शिक्षण आणि समीक्षात्मक विचारांचे मूल्य समजणारे पुरेसे लोक एकत्र आले आणि  स्वीकार, समावेशकता आणि नम्रता (भीती, तिरस्कार आणि अभिमान यांच्या विरोधातील भावना) यांचा पुरस्कार करू लागले, तर फॅसिझमचा प्रसार थांबवता येण्याची थोडीफार शक्यता आहे.
असे करू शकलो नाही तर काय होईल ते इतिहासाच्या काळ्या पानांमध्ये लिहिलेले आहेच!
रोहित कुमार, हे शिक्षणतज्ञ आहेत.
चित्रकर्ता : परिप्लब चक्रवर्ती

Tuesday, 13 November 2018

लोहियांच्या विचारांचा आजचा अर्थ – डॉ. भालचंद मुणगेकर


लोहियांच्या विचारांचा आजचा अर्थ
Posted: मार्च 21, 2010 in राजकारण, वैचारिक  
टॅगस्गैरर्कॉंग्रेसवाद, लोहिया, समाजवाद, समानता 3
डॉ. भालचंद मुणगेकर , सौजन्य मटा
डॉ. राममनोहर लोहिया यांची जन्मतारीख २३ मार्च, १९१०. दोन दिवसांनी त्यांची शंभरावी जयंती. भारतीय समाजवादाचे सर्वांत प्रभावी प्रवक्ते डॉ. लोहियाच होते. त्यांच्या मूलगामी विचारांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला. त्यांच्या विचारांचा आजचा अर्थ सांगणारा हा विशेष लेख.
काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची १९३४ साली स्थापना झाली. बौद्ध तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेले आणि समाजवादाला नैतिक अधिष्ठान हवे, असा आग्रह धरणारे आचार्य नरेंद देव मे १९३४ मध्ये पाटण्यातल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जयप्रकाश नारायण त्याचे प्रमुख सूत्रधार होते. १९५६ साली आचार्य गेले. १९५३ साली समाजवादी कार्यक्रमांवर जयप्रकाशांची नेहरूंशी झालेली बोलणी फिसकटली. त्यामुळे, तसेच पक्षातील कारणांमुळे १९५४ साली जेपी सवोर्दयी चळवळीत गेले. १९५३ मध्ये अशोक मेहता मागास अर्थव्यवस्थेतील राजकीय अपरिहार्यता आणि सहकार्याची समान क्षेत्रेअसा सिद्धान्त मांडून काँग्रेस लोकशाही समाजवादीकडे जात आहे अशी भूमिका मांडून काँग्रेसमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर १९५२ मधल्या पंचमढी अधिवेशनापासून १९६८ मध्य५हत्त्वाचा आहे. लोहियांनी मार्क्सनंतर अर्थशास्त्राचे स्वरूप कसे बदलले, उत्पादन तंत्रातील बदलांचा कामगारवर्ग आणि शोषणाच्या स्वरूपावर कसा परिणाम झाला, गरिबी-बेकारी-विषमता नष्ट करण्यासाठी भांडवलशाही आणि साम्यवाद हे दोन्ही पर्याय कसे गैरलागू आहेत हे यात सांगितले, तर समाजवाद : काळा-गोराया पुस्तकात पाश्चिमात्य देशातील समाजवादापेक्षा आशियातील समाजवाद कसा वेगळा असेल, केंद-राज्य-जिल्हा व खेडे या चौखांब्यावर आधारित विकेंदित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आहे. जमिनीच्या फेरवाटपावर आधारित शेतीची पुनर्रचना आणि मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण त्यांना अभिप्रेत होते. समाजवादी आणि संयुक्त समाजवादी पक्षांच्या जाहीरनाम्यात त्यांनी समाजवादाचे कार्यक्रम सुचविले. परंतु लोहियांसकट सर्व समाजवाद्यांच्या आथिर्क भूमिकेचे श्रेष्ठ श्रेणीची संमिश्र अर्थव्यवस्थाअसे सारांशाने वर्णन करता येईल.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि अहिंसेवर अपार निष्ठा असल्यामुळे लोहियांचा साम्यवादाला कडवा विरोध होता. त्यामुळे साम्यवाद्यांची कामगार वर्गाची हुकूमशाहीत्यांना मान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भारतात साम्यवादी आणि समाजवादी चळवळी समांतरच नव्हेत, तर एकमेकांच्या कट्टर विरोधक राहिल्या. साम्यवाद्यांनी सुधारणावादी म्हणून समाजवाद्यांची हेटाळणी केली; तर समाजवाद्यांना जमातवाद्यांशी जवळीक करायला संकोच वाटला नाही. त्यातच साम्यवाद्यांच्या भूमिका दीर्घकाळ सोविएत युनियनवर अवलंबून राहिल्या. साम्यवादी आणि समाजवाद्यांच्या एकांगी आणि परस्परविरोधी भूमिकांमुळे भारतात श्रमिकांचे राजकारण सतत क्षीण राहिले.
आचार्य नरेंद देव आणि जेपींवर जसा मार्क्सवादाचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला, तसा लोहियांवर गांधीजींचा राहिला. लोहिया मार्क्सवादाच्या मर्यादा सांगूनच थांबले नाहीत. तर त्यांनी मार्क्सवादाविरोधी भूमिका घेतली. पंचमढीत, कार्यर्कत्यांच्या आग्रहाने मी मार्क्सवादी नाहीकिंवा मार्क्सवादाच्या विरोधात नाही,’ असे जरी लोहिया स्पष्ट म्हणाले, तरी ते शंभर टक्के गांधीवादी असल्यामुळे ते मार्क्सवादाच्या विरोधात असणे स्वाभाविकच होते. समाजवादी चळवळीत मार्क्सवादाच्या विरोधात मनोभूमिका तयार होणे, हा त्याचा अपरिहार्य परिणाम होता. समाजवादी चळवळीचे नुकसान होण्याचे तेही एक कारण आहे.
गैरकाँग्रेसवाद
१९६३मध्ये फरुकाबाद पोटनिवडणुकीतून लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात तीस कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न तीन आणे असल्याचे सांगून चचेर्चा प्रारंभ केला. परंतु संपत्तीबरोबर सर्व प्रकारची सत्ता आणि प्रतिष्ठेचेही विषम वाटप झाल्याचा त्यांना संताप होता. डॉ. आंबेडकरांशिवाय जातिव्यवस्थेमुळे समाजाचे कसे अध:पतन झाले, याचा सकस विचार फक्त लोहियांनी केला. जात म्हणजे अपिरवर्तनीय वर्ग आणि वर्ग म्हणजे बंदिस्त जातअशी त्यांची मीमांसा होती. जात म्हणजे बंदिस्त वर्गया डॉ. आंबेडकरांच्या मीमांसेशी ती मिळतीजुळती होती.
भारतातील दैन्य, गरिबी, विषमता या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी खात्री झाल्यानेच लोहियांनी गैरकाँग्रेसवादमांडला आणि जनसंघापासून स्वतंत्र पक्षापर्यंत सर्वांची एकजूट करून १९६७ मध्ये नऊ राज्यांत संविद सरकारे आणली. लोहियांच्या निधनानंतर समाजवाद्यांचा गैर काँग्रेसवादइतका टोकाला गेला की जनसंघ असलेल्या जनता पक्षात आपले अस्तित्व विलीन करायला ते कचरले नाहीत. १९८० नंतर हिंदू राष्ट्रवादही ठाम भूमिका असल्याने भाजपच्या रूपाने जनसंघ पुन्हा उभा राहिला. सत्तेवरही आला. परंतु १९८० मध्ये समाजवादी पक्ष आणि चळवळ कायमची संपली. नकारात्मक राजकारण आणि सुस्पष्ट राजकीय विचारप्रणालीचा पर्याय उभा करण्यातली असमर्थता हीच त्याची प्रमुख कारणे होत.
सांस्कृतिक संदर्भ
डॉ. लोहियांना स्वातंत्र्यानंतर राजर्कत्यांची मानसिकता, त्यांचे धोरणात्मक अग्रक्रम, साम्राज्यवादाच्या प्रतिकांविषयींची भूमिका, आथिर्क ढांचा, समाजरचना, विषमता इ. बाबतीत गुणात्मक बदल होईल, असे वाटले व तसे न झाल्याची मनस्वी चीड आली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.

ज्या वंदे मातरम्साठी हजारोंनी तुरुंगवास भोगला त्याऐवजी जन गण मनराष्ट्रगीत केल्याचा त्यांना खेद होता. क्रिकेटला जवळपास मिळालेल्या राष्ट्रीय दर्जाचा राग होता. इंग्रजी हे शोषणाचे हत्यार असल्याची त्यांची भूमिका होती. लोहियांचा विरोध इंग्रजीला भाषाम्हणून नव्हता, तिला मिळालेल्या असाधारण प्रतिष्ठेला होता. आरोपीच्या जीवनमरणाचा वाद न्यायालयात त्याला न समजणाऱ्या इंग्रजीत चालण्याला होता. आजही शुद्ध मराठी बोलणाऱ्यापेक्षा अशुद्ध वा चूक इंग्रजी बोलणाऱ्याला अधिक प्रतिष्ठा आहेच.
स्त्री-पुरुष समानता
डॉ. आंबेडकरांचा अपवाद सोडला तर स्त्रियांचे गौणत्व आणि त्यांची सक्षमता याचा विचार लोहियांइतका कुणी केला नाही. जातिप्रथा आणि स्त्रियांची अवनती ही भारताच्या अध:पतनाची दोन प्रमुख कारणे असल्याचे ते आग्रहाने म्हणत. कनिष्ठ जाती, अन्य मागास आणि मुसलमान यांना केवळ समान संधीच नव्हे, तर विशेष संधीचापुरस्कार करताना लोहियांनी त्यात स्त्रियांचाही समावेश केला. आज लोहियांनी महिला आरक्षणात ओबीसी व मुस्लिम महिलांच्या स्वतंत्र आरक्षणाचा आग्रह धरलाच असता.
विवाह आणि स्त्री-पुरुष संबंधाबाबत भारतीयांचे मन गलिच्छ असल्याचे लोहियांचे मत होते. पावित्र्याच्या कल्पनांमुळे स्त्रीची गुलामी फक्त चुलींपुरती राहिली नाही तर पापपुण्याच्या बेड्याही तिच्या पायात अडकल्या. त्यातही तिच्या शरीराला अधिक महत्त्व देण्यात आले. स्त्री-पुरुष संबंधात दोनच अपराध आहेत : बलात्कार आणि खोटे बोलणे वा वचनभंग. सावित्रीपेक्षा बंडखोर दौपदीविषयी अभिमान वाटणाऱ्या लोहियांना रुढी व संकेतांच्या विरोधात तरुणींचे बंड अभिप्रेत होते. स्त्रियांची चळवळ आज या दिशेने जाते आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
गौर वर्णाचे साम्राज्य
आशियासारख्या उष्मा कटिबंधात गौरवर्ण हा सौंदर्याचा निकष मानणे, हा सौंदर्यशास्त्राचा विपर्यास आहे, असे लोहिया म्हणत. दौपदी सावळी होती, याचा त्यांना अभिमान वाटे. जवळपास तीन शतके युरोपीय गोऱ्यांनी जगावर अधिसत्ता गाजविली. जेत्यांची गुणवैशिष्ट्ये नेहमीच पराभूतांवर लादली जातात. किंवा पराभूत ती भूषण म्हणून मिरवतात. लोहिया म्हणतात, ‘कृष्णवणिर्यांची जगावर सत्ता असती तर स्त्रीसौंदर्याचे निकष बदलले असते. राजकारण सौंदर्यकल्पनांवरही वर्चस्व गाजविते. अद्वितीय सत्ता तर सुंदरही दिसू लागते.
अभिजात रसिकता
लोहियांनी भारतातील शिल्प, साहित्य आणि इतर कलांचा आस्वाद घेतला. त्यावर भाष्य केले. शिल्पकलेविषयी ते म्हणतात, ‘इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय, भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा-कहाण्यांच्याद्वारे तो सांगून ठेवला आहे. इतिहास संतापला. त्याने सूड घेतला आणि सर्वांत अधिक काळ टिकणाऱ्या पाषाणावर चित्ररूपाने त्याने स्वत:ला खोदून ठेवले.परंतु ते त्वरित या पोकळपणावर बोट ठेवतात. एका बाजूला श्वास रोखून धरणारे शिल्पांतील चिरंतन सौंदर्य, तर दुसऱ्या बाजूला इतिहास आणि धर्मचिंतनातील रितेपण हा विरोधाभास त्यांना अस्वस्थ करतो. त्यांनी दिल्लीचे मनोज्ञ वर्णन केले आहे. ते म्हणतात की पॅरिस, वॉशिंग्टन, लंडन, टोकिया यांच्यापेक्षा दिल्ली सर्वांत मोहक आहे हे खरे, परंतु ती अत्यंत नीच वेश्या आहे. जेत्यांसमोर ती नेहमीच वक्ष:स्थळ उघडत आली आहे.
हवी नवी मांडणी
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर समाजवादाचे स्वरूपच बदलले आहे. आता बाजारपेठेचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, त्याचा विचार करणे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी दैन्य, विषमता व बेरोजगारी दूर करून चिरंतन विकासासाठी बाजारपेठेवर निर्णायक व अतिरेकी भिस्त ठेवणारे आणि साम्यवादी या दोघांनाही लोकशाही समाजवादाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, जमातवादविरोध, धर्मनिरपेक्षता, व्यामिश्र संस्कृतीवर आधारित राष्ट्रवाद, संतुलित प्रादेशिक विकास, जागतिक शांतता अशा मूलभूत कार्यक्रमांवर आधारित विचारप्रणाली तयार करावी लागेल. कोणत्याही एका ग्रंथात किंवा विचारप्रणालीत याची उत्तरे नाहीत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित लोकशाही समाजवादाची पुनर्मांडणी करणे, हीच डॉ. लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल!