लेखक - पार्थ एम. एन.
या पत्रकाराचं नाव आहे मीना कोतवाल. ती ३३
वर्षांची आहे आणि ‘द मूकनायक’ नावाची वेबसाइट तिने सुरू केलेली आहे.
लेखक - पार्थ एम. एन.
या पत्रकाराचं नाव आहे मीना कोतवाल. ती ३३
वर्षांची आहे आणि ‘द मूकनायक’ नावाची वेबसाइट तिने सुरू केलेली आहे.
November 12, 2022 00:10 IST
अरुणा ढेरे
समाजाच्या विविध थरांमधून स्त्रिया
भिक्षुणीसंघात आल्या आणि बुद्धांच्या उपदेशानं त्यांनी निर्वाणाची आस धरली. त्या
स्त्रियांनी- अर्थात ‘थेरीं’नी लिहिलेली वचनं म्हणजे ‘थेरीगाथा’. या स्त्रीच्या नाजूकपणाच्या, प्रापंचिक सुखाच्या वा
सृष्टीसौंदर्याच्या कथा नाहीत. संघर्ष करत, दु:ख, प्रलोभनं दूर सारत, भावनांच्या पाशातून वेगळय़ा होऊ
पाहाणाऱ्या स्त्रियांचे हे उद्गार प्रत्येकानं वाचायलाच हवेत असे.
‘थेरीगाथा’ हा बौद्ध भिक्षुणींच्या
वचनांचा-उद्गारांचा संग्रह आहे. ‘थेर’ म्हणजे मुळात ‘स्थविर’. बौद्ध भिक्षूंना स्थविर किंवा थेर म्हणतात आणि भिक्षुणी म्हणजे थेरी; म्हणजे स्थविरी. मराठीत, बोलीभाषेत आपण थेरडा
किंवा थेरडी असे शब्द वापरतो. मूळ ज्येष्ठ किंवा वृद्ध अशा अर्थानं हे शब्द आहेत.
या शब्दांच्या अर्थाचा थोडा अपभ्रंश करून अनेकदा राग, तुच्छता किंवा हेटाळणी अशा अर्थच्छटेनं आपण ते वापरतो. मात्र थेर म्हणजे मोठे, ज्येष्ठ, थोर. केवळ शरीरानं ज्येष्ठ नव्हेत, तर ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ, ते थेर-थेरी!
या थेर-थेरींच्या गाथा बुद्धवचनांच्या संग्रहात
समाविष्ट आहेत. बुद्धाच्या वर्तन-वचनांमुळे जे ‘जागे’
झाले, त्यांना झालेला बोध
म्हणजे त्यांच्या गाथा. त्यामुळे त्याही बुद्धवचनांचा प्रत्यक्ष प्रत्यय देणाऱ्या
म्हणून बुद्धवचनसंग्रहात त्यांचा समावेश झाला आहे. गौतम बुद्धांच्या शिष्यांनी
बुद्धाचा उपदेश सांभाळला आणि तीन प्रचंड विभागांमध्ये तो जतन करून ठेवला. ते तीन
विभाग म्हणजे तीन पेटारे किंवा ‘पीटक’. त्रिपीटक किंवा तिपीटक. या तीन पीटकांमधल्या एका पीटकात- सुत्तपीटकात
बुद्धवचनांखेरीज पाच अवांतर संग्रह आहेत. त्यातल्या एका संग्रहात थेर किंवा थेरी
यांची वचनं समाविष्ट आहेत. बहुधा इसवी सनपूर्व पहिल्या शतकात हे संग्रह तयार झाले
असावेत. अभ्यासकांनी म्हटलं आहे की, हे पाली भाषेतून
सिद्ध झालेलं जगातलं प्राचीनतम संतसाहित्य आहे. त्यावर भाष्य करणारा पहिला उत्तम
ग्रंथ ‘परमत्थदीपनी’ म्हणजे ‘परमार्थदीपनी’ हा धम्मपाल या पंडितानं पुढे लिहिला.
त्रिपीटकातल्या गाथासंग्रहात त्र्याहत्तर
थेरींनी उच्चारलेल्या सव्वापाचशेहून अधिक, म्हणजे पाचशे
चौतीस गाथा आहेत. गाथा म्हणजे भाषितं. त्यांना ‘उदान’
असं म्हटलं जातं. बौद्ध भाष्यांमधली ही शास्त्रीय संज्ञा
आहे. उदान म्हणजे सहजस्फूर्त उद्गार. स्वाभाविक ऊर्मीनं उच्चारलेले शब्द!
आनंदाच्या भरात हृदयातून सहजपणे उचंबळून उठलेला उमाळा म्हणजे उदान.
निर्वाणप्राप्तीच्या आनंदात जे उद्गार भिक्षू-भिक्षुणींच्या मुखातून बाहेर पडले ते
म्हणजे उदान. हे अनुभव धर्मक्षेत्रापुरतेच मर्यादित असले, तरी ते एक भावकाव्यच आहे आणि स्त्रीलिखित किंवा स्त्रीउच्चारित भारतीय कवितेत
त्याला मानाचं स्थान आहे.
अर्थात मध्ययुगीन विरागिनींच्या
भक्तिकाव्यापेक्षा हे पुष्कळ वेगळं काव्य आहे. धर्मतत्त्वांचा तो प्रत्यक्ष अनुभव शब्दांकित
झाला आहे. त्यात एक उत्कट असा भाववेग आहे. पाली भाषेत त्यासाठी एक अगदी अन्वर्थक
शब्द आहे- ‘धम्मसंवेग’! बौद्ध थेरांच्या गाथांमधून हा संवेग निसर्गाच्या रौद्रसुंदर दर्शनानं प्रकट
झाला आहे. सृष्टीच्या विलसितांचा उल्हसित करणारा अनुभव त्यांच्या गाथांमधून सहजपणे
अवतरला आणि थेरींच्या गाथांमधून त्यांचा जीवनसंघर्ष व्यक्त झाला. त्यांनी जीवनावर
मिळवलेल्या विजयाचा आनंदस्वर ऐकू येतो आहे.
या थेरी म्हणजे बुद्धाच्या मुली आहेत.
सुंदरी स्थविरी म्हणते, ‘‘मी बुद्धाची मुखजात कन्या आहे. मौखिक
उपदेशातून जन्माला आलेली त्याची औरस कन्या आहे.’’ धर्मदीक्षा घेतल्यानंतर बुद्धाच्या लेकी म्हणून नवा जन्म घेतलेल्या या
स्त्रिया खूप मोठय़ा संघर्षांला सामोऱ्या गेलेल्या आहेत. बौद्धांची धर्मसाधना
म्हणजे चित्तवृत्तींचा विरोध करत खंबीर होत जाण्याची साधना. जन-विजनात भटकंती करत
असताना एकीकडे बाह्य संरक्षणाच्या कला त्यांनी विकसित केल्या. असं मानलं जातं, की सध्याच्या ज्यूदो, तायक्वांदो, कुंग फू, कराटे अशा संरक्षणकला हे त्यांचंच विकसित
रूप आहे. या कलांमध्येच मिसळून असलेल्या आंतररक्षणाच्या ध्यान-विपश्यनेसारख्या कला
आत्मसात करत बौद्ध साधक स्त्री-पुरुष निर्वाणप्राप्तीची अवघड वाट चालले.
थेरीगाथांमधून या वाटचालीचंही दर्शन होतं. संपूर्ण स्वावलंबनानं स्वत:ची ओळख करून
घेणाऱ्या या थेरींनी संयम, स्वसंयोजन, स्वयंशासन आणि साहस यांच्या आधारानं आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव प्राप्त केला, त्याचा उच्चार त्यांनी गाथांमधून केला आहे.
समाजाच्या विविध थरांमधून भिक्षुणीसंघात
या स्त्रिया दाखल झाल्या आहेत. त्यात मोलमजुरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, भिक्षेवर निर्वाह करणाऱ्या आहेत, वनवासी आहेत, श्रीमंत-अतिश्रीमंत घरांमधल्या आहेत. विद्यावंत, प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या गृहिणींपासून, राजवंशात
जन्मलेल्या स्त्रियांपासून लावण्यवती गणिकांपर्यंत इतर नाना प्रकारच्या
वर्ण-वर्गामधल्या स्त्रिया आहेत. या स्त्रियांनी बौद्ध संघात प्रवेश केला आणि
आपल्या पूर्वायुष्याचा लोप करून टाकला. निर्वाणप्राप्ती हेच त्यांचं एकमेव
उद्दिष्ट उरलं. त्यासाठी केलेल्या साधनेचा विस्तारानं उच्चार त्यांनी केला नाही, पण जाता जाता बौद्धांचे साधनामार्ग मात्र काही जणींनी दाखवले आहेत. उदाहरणार्थ, जेन्ता थेरी म्हणते, ‘निर्वाणप्राप्तीचे जे बोध्यंगरूपी
सात मार्ग आहेत, त्यांची बुद्धांच्या उपदेशानुसार मी साधना
केली.’ गुप्ता थेरी स्वत:शीच बोलते, स्वत:लाच सांगते की, ‘लाडका मुलगा किंवा आवडता प्राणी
यांना सोडून तू ज्यासाठी प्रवज्या घेतलीस, तिचंच पालन कर.
मनाच्या स्वाधीन होऊ नकोस. राग, अभिमान, अविद्या आणि औद्धत्य टाकून.. तू दु:खाचा शेवट कर.’
अशा धर्मानं निश्चित केलेल्या साधनेत या
स्त्रिया मग्न झाल्या खऱ्या, पण प्रत्येकीचा
निर्वाणप्राप्तीचा अनुभव वेगळा, काळाचा तो तुकडा वेगळा
आणि त्या अनुभवात सामावण्याचं प्रत्येकीचं निमित्तही वेगळं. एखादी उत्तरा
रात्रीच्या पहिल्या प्रहरी पूर्वजन्माचं स्मरण करता करता मधल्या प्रहरी आपले
दिव्यचक्षू शुद्ध करते आणि त्रविद्य होऊन उठते. एखादी सिंहा सात वर्ष स्वत:शी
झगडते, पण अखेर निर्वाणप्राप्ती होत नाही म्हणून गळफास घ्यायला निघते.. आणि त्याच
क्षणी तिला मुक्तीचा अनुभव येतो. एखादी धर्मा लटपटत्या पायांनी भिक्षा मागताना
जमिनीवर कोसळते आणि त्याच वेळी शरीराच्या नश्वरतेची जाण तिला मुक्तीकडे घेऊन जाते.
एखादी सुमंगलमाता वृक्षातळी ध्यान लावते आणि तिला परमसुखाचं निर्वाण प्राप्त होतं.
या थेरींचे उद्गार मग फक्त शांत होण्याचे, निर्वाणप्राप्तीच्या आनंदाचे होतात. त्यांच्या गाथा या मुक्तीच्या गाथा आहेत.
प्रपंचातून देहानं बाहेर पडण्याच्या आणि नंतर मनानं सगळय़ा विचार-विकारांपासून दूर
होत जीवनाच्या गुंत्यातून बाहेर पडण्याच्या. या स्त्रियांनी निसर्गाची गाणी गायली
नाहीत. प्रेमाची आणि सहज सुखदु:खांची गाणी गायली नाहीत. भिक्षुणी होण्यापूर्वी
त्या कुमारी, प्रौढा आणि वृद्धा म्हणून जगल्या. कुणी
प्रपंचानं पोळून निघाल्या म्हणून, कुणी प्रपंचाचं वैयर्थ्य
आणि देहाची अनित्यता समजली म्हणून आणि कुणी मुक्तीची आस निर्माण झाली म्हणून
स्वेच्छेनं थेरी झाल्या. अगदी धीट आणि स्पष्ट आहेत त्यांचे उद्गार!
एक थेरी म्हणते,
‘मी मुक्त! छान मी मुक्त!
उखळ, मुसळ अन् कुबडा
(नवरा)
जनन-मरण फेऱ्यातून झाले मुक्त!
भवतृष्णा झाली नष्ट,
मी मुक्त! मुक्त मी! मुक्त!’ स्वयंपाकपाण्यापासून आणि
नकोशा नवऱ्यापासून मुक्त झाल्याचा आनंद ती सांगते. दुसरी एक चंद्रा उपासमारीला कंटाळते.
दारिद्रयानं गांजून जाते.
ती सांगते,
‘हलाखीचे जिणे माझे, नाही पती, नाही पूत
आप्तजनही नव्हते, अन्नवस्त्राची ददात
दारोदार भिकारीण, काठी-कटोरा हातात
सात वर्षे फिरले मी थंडी-उन्हाच्या दाहात’ आणि मग तिला एक थेरी
भेटली. तिच्याकडून उपदेश घेतला आणि बौद्ध संघात ती आली. म्हणाली,
‘माझ्या श्रवण-वर्तने आर्या-उपदेश फळे
तीन विद्यांची मी ज्ञाती आस्रविरहित झाले’
एक होती सुजाता. तरुण मुलगी. श्रीमंत
घरातली सून. एकदा दासींबरोबर विलासाची सगळी साधनं घेऊन ती उद्यानात रमलेली असताना
बुद्धाची भेट झाली आणि तिचं मन त्याच्या वाणीनं-उपदेशानं इतकं बदललं की, सगळं वैभव मागे ठेवून ती भिक्षुणी झाली.
पुत्रशोकानं वेडय़ा झालेल्या कृशा गौतमीची कथा तर सर्वश्रुत आहे. गरिबाघरची
म्हणून सासरी अवहेलना सोसताना तिला मुलगा झाला आणि तिनं कुळाला पुत्र दिल्यामुळे
तिचे हाल थोडे कमी झाले. पण तो मुलगाच मरण पावला आणि गौतमी वेडीपिशी झाली. ‘माझा मुलगा जिवंत करा’ असा आग्रह करणाऱ्या तिला सांगितलं, ‘बाई गं, ज्या घरात एकही मृत्यू आजपर्यंत झालेला
नाही, अशा घरातून मला थोडी मोहरी आणून दे. मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करतो.’ गौतमी दारोदार हिंडली आणि मृत्यू हे एक अटळ, अपरिहार्य सत्य आहे, हे तिला हळूहळू उमगून आलं. ती शांत
झाली.
एक अभिरूपा नंदा होती. अतिशय देखणी.
कपिलवस्तूतली ती सधन क्षत्रियकन्या. चरभूत हा शाक्य राजपुत्र तिचा प्रियकर होता.
लग्न व्हायचं त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. नंदेच्या आईबापांनी तिला मग सक्तीनं
भिक्षुणीसंघात दाखल केलं, पण नंदेला विरक्तीचा मार्ग मान्य
नव्हता. सक्तीचं वैराग्य तिनं मनानं स्वीकारलंच नाही. उपदेशासाठी महाप्रजापती
गौतमी गौतम बुद्धांकडे भिक्षुणीला पाठवत असे. त्याचा उपदेश ऐकण्याची नंदेला मात्र
मुळीच इच्छा नव्हती. तिनं दुसऱ्याच भिक्षुणीला स्वत:ऐवजी पाठवून दिलं. शेवटी
बुद्धांच्या सूचनेनुसार तिला एक दिवस त्यांच्यासमोर जावंच लागलं. मनात तीव्र नकार
घेऊन ती बुद्धाकडे गेली, तेव्हा बुद्धानं तिच्यासमोर तरुणी, प्रौढा, वृद्धा अशा स्त्रीच्या तिन्ही अवस्था
उभ्या केल्या. एके काळचं लावण्य नंतर संपूर्ण नष्ट होणार हे तिला कळून आलं आणि ती
भानावर आली.
भद्रा, कुंडलकेशा, पटाचारा, विमला, अद्धकाशी, आम्रपाली, चापा या भिक्षुणींच्या गाथांमागची जीवनं
म्हणजे तर स्वतंत्र कथांचे विषय आहेत. त्या काळातल्या समाजजीवनाचा एक उभा छेदच आपण
त्यामधून घेऊ शकतो. जातिबद्ध, लिंगबद्ध आणि दु:खबद्ध
अशा तत्कालीन समाजव्यवस्थेला पर्याय म्हणून जातिनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष आणि दु:खमुक्त अशा धर्ममार्गावर चालणाऱ्या स्त्रियांच्या या गाथा
आहेत.
लिंग आणि देह हे दोन्हीही
परमार्थक्षेत्रात महत्त्वाचे नाहीतच, कारण दोन्हीही
भ्रममूलक आहेत, असं बौद्ध तत्त्वज्ञान मानतं. देहाशी
जीवनातल्या दु:खांचे अटळ बंध आहेत. म्हणून निर्वाणाच्या मार्गातला देह हा एक
अडथळाच आहे, असं हे तत्त्वज्ञान सांगतं. साधनेच्या
बळावर दैहिक प्रेरणा आणि वासनांवर ताबा मिळवण्याचा मार्ग बुद्धानं दाखवला.
बुद्धानं स्त्रीला दु:खाचं आगर मानलं आहे, कारण ती
प्रपंचाशी, भौतिकाशी दृढपणे बांधली गेली आहे.
धर्मजीवनात थेरींना भेटलेला बुद्ध हा करुणेचा सागर होता. त्यांच्याविषयीच्या
ममत्वभावाने भरलेला होता. त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा तो श्रेष्ठतम गुरू
होता. त्याच्यावर भरवसा ठेवून बौद्ध संघात आलेल्या अनेकींना स्वत:च्या देहाशी
प्रथम संघर्ष करावा लागला आहे. देहाच्या विकारांना ताब्यात ठेवण्यासाठी झगडावं
लागलं आहे. नंदोत्तरा, सिंहा, क्षेमा, अद्धकाशी, विमला यांना देहाच्या वासनांपासून मुक्त होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
या देहस्विनींच्या गाथा म्हणजे बुद्धिमान अशा साहसी स्त्रियांच्याच गाथा आहेत. या
स्त्रियांना लोभावणारा ‘मार’ हा बौद्ध चिंतनातून गाथांमध्येही आलेला आहेच. मार हे मोहाचं प्रतीक आहे. तो या
स्त्रियांना सन्मार्गापासून ढळवण्याचा प्रयत्न करतो. सोमा नावाच्या थेरीची हेटाळणी
करताना तो म्हणतो, ‘जे स्थान केवळ ऋषींनीच प्राप्त करावं
असं आहे,
ते केवळ दोन बोटांची प्रज्ञा असणाऱ्या स्त्रीला प्राप्त
होणं शक्य नाही.’ द्वयंगुल प्रज्ञा म्हणजे दोन बोटांची
प्रज्ञा. स्वयंपाकाशी अटळपणे बांधली गेलेली बाई भात शिजला की नाही हे बघण्यासाठी
भाताचं शीत दोन बोटांनी दाबून पाहते. बायकांची बुद्धी शितावरून भाताची परीक्षा
करण्याइतकीच असते, असं मार तिला खिजवून म्हणतो. त्यावर
सोमानं उत्तर दिलं आहे की, ‘माझं चित्त मी सुसमाहित केलं आणि
ज्ञान प्राप्त केलं. सम्यक् धर्म मला समजला. मग माझं स्त्रीत्व कशाच्या आड येणार? आनंददायक वाटणारी तृष्णा मी नष्ट केली आणि अंधाराचा संचय फोडून टाकला. आता, हे पाप्या, तू समजून अस की तू अंतक आहेस, पण मीच तुला ठार केलं आहे.’
सोमा ज्ञानाची गोष्ट करते. जीवनाचं सम्यक्
स्वरूप समजणं, धर्माची मूलतत्त्वं समजणं, याबाबतीत स्त्री-पुरुष भेद संभवतच नाही. पण अशा पातळीवर पोहोचण्यासाठी या
थेरींना जो संघर्ष करावा लागला, त्यात त्यांच्या मनाची
स्वाभाविक कोवळीक बहुधा संपून गेली असावी. भवतालच्या सौंदर्याची आणि भावात्मतेची
सुखद चित्रं थेरीगाथांमधून उमटलेली दिसत नाहीत ती त्यामुळे. तरीही या गाथा वाचताना आपल्याला विस्मयाची एक
आनंददायक जाणीव होते. विस्मय याचा, की बुद्धासह
सर्वानीच जिला प्रपंचाचं प्रतिरूप म्हणून दु:खमय मानलं, तिनंच प्रपंचाच्या आणि दु:खाच्या पार गेल्याचा निर्वाळा किती उमाळय़ानं दिला
आहे. आणि विस्मय याचाही, की स्त्रीकडे पाहाण्याची एक दृष्टी
या गाथांनी किती सहज आपल्याला दिली आहे. भिकारीण असो, वेडी असो, परित्यक्ता असो, की वेश्या असो, कोणीही निर्वाण प्राप्त करू शकतं; कोणालाही मुक्ती मिळू शकते. केवढा मोठा दिलासा आहे हा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक दुबळय़ाला, प्रत्येकालाच! शिवाय स्त्रियांना हे
आश्वासन मिळालं आहे की, आपण साहस करू शकतो, झगडू शकतो, विश्वासानं- स्वत:वरच्या विश्वासानं उभ्या
राहू शकतो. स्त्रीच्या नाजूकपणाच्या गाथा
नाहीत या. विश्रब्ध प्रापंचिक सुखाच्याही नाहीत. या गाथा आहेत दु:खाचे डोंगर फोडून
पलीकडे गेलेल्यांच्या. प्रलोभनांची चिवट जाळी फाडून फेकलेल्यांच्या. भावनांच्या
कारांमधून धैर्यानं निसटणाऱ्यांच्या. दोन्ही हात उंचावत निर्वाणाचा- मुक्तीचा
आनंदघोष करणाऱ्या स्त्रियांचे हे शांत आणि उत्स्फूर्त उद्गार आहेत आणि बौद्ध
वाङ्मयानं ते दोन हजार वर्ष सांभाळले, म्हणून आज
आपल्यापर्यंत ते येऊ शकले आहेत. धर्मरत स्त्रियांची मुक्तीची आस, त्यांनी लौकिक-अलौकिक पातळीवर केलेला संघर्ष आणि त्यांनी निर्धारानं प्रेयसाचा
त्याग करत प्राप्त केलेलं त्यांचं निर्वाण- त्यांचं श्रेयस, यांचं दर्शन घडवणारी ही अ-पूर्व कविता भारतीय काव्यपरंपरेतही स्वतंत्र स्थान
मागणारी आहे.
aruna.dhere@gmail.com
६ डिसेंबर १९५६... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस... अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती... नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती... प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता... त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली... आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला... जस कळेल तसं शहरातून, खेडोपाड्यातून पाऊल मुंबईच्या दिशेने पडू लागली होती... या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या असवाने मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता... या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती... या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या.... त्या शेवटच्या क्षणांना कायमच कैद करणारे, त्यासाठी आपलं राहत घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत, ही माहिती पुढं आली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे...
माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी... कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला... तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू... एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे... जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं... एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे... यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला... तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं... वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला... त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला 'दलित मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित केलं...
६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते...त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं...चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही...
अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता... काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले....
बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आले...
या सगळ्या चित्रीकरणासाठी एकूण २ हजार ८०० फूट रील संपली होती... दुसऱ्या दिवशी बाँबे फिल्म लॅबोरेटरीत ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली... आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रशप्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी अडीच ते तीन हजार खर्च येणार होता... त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहत घर गहाण ठेऊन तीन हजार रुपये आणले... पुढं या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवत्या आल्या नाहीत... त्यामुळे त्या कायमच्या गेल्या...मुंबई सोडावी लागली...
मालमत्ता गेली तर गेली... पण बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या, त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगांयुगासाठी कैद करता आलं, याच समाधान त्यांना होतं... आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणांची नामदेवराव यांनी केलेलं हे जगातील एकमेव चित्रफीत आहे... या गोष्टींचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याच भांडवल केलं नाही...
(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी...)
(आज कोल्हापूरात त्यांची जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं... त्या कार्यक्रमात मला ही माहिती मिळाली... इतिहासातील एवढ्या मोठ्या घटनेचा उल्लेख कुठंच नसल्याची खंत वाटली.. म्हणून ही माहिती तुमच्या समोर आणली...)
यातील चित्रीकरण आणि त्यावेळच्या आठवणी हा संदर्भ त्यांच्या "कथा माझ्या जन्माची" या आत्मचरित्रातून घेतला आहे... नामदेवराव व्हटकर समजून घ्यायचे असतील तर हे आत्मचरित्र नक्की वाचा...
माध्यम कर्मिंनी वाचलाच पाहिजे हा लेख.
भांडवली नफेखोर विकानितीचे अर्थशास्त्र म्हणजे काय?आणि पर्यावरणाचे रक्षण,संवर्धन ,जतन करायचे असेल तर भांडवली विकासनिती नाकारून हरित राजकारण हे स्वीकारावेच लागेल हे स्पष्ट करणारा हा लेख.
++++++++++++++++++++++;
आजच्या पुण्यनगरीतील माझा लेख
सिंजेंटा विरुद्ध डॉ टायरोन हेज
सन १९९९ . अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील इमारतीतील हॉल. एक कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ उभा होता . पस्तिशीच्या आसपास वय .स्थूल शरीर .साधारण पाच साडेपाच फुट उंची . चौकोनी चेहरा .चेहऱ्यावर दाढीची व्यवस्थित कापलेली वक्र रेष . केसांचा पोनीटेल बांधलेला ,अंगात काळा कोट ,चेहऱ्यावर थोडीशी चिंता असा तो शास्त्रज्ञ पाच सहा गोऱ्या माणसांच्या समोर आपल्या प्रयोगाचे निष्कर्ष मांडत होता . त्याना तो मोठ्या पडद्यावर बेडकांची छायाचित्र दाखवू लागला . तो म्हणाला , “ बेडूक फुफ्फूस व त्वचेद्वारेही श्वासोंश्वास करतो . बेडकाच्या त्वचेतून ऑक्सिजन सहज शोषला जातो . परंतु पाण्यात विरघळणारी किटकनाशके ,तणनाशकेही त्वचेद्वारे सहज बेडकांच्या शरीरात प्रवेश करतात . तुमच्या कंपनीच उत्पादन , अॅट्रॅझिन तणनाशक याच मार्गाने बेडकांच्या शरीरात प्रवेश करत . अॅट्रॅझिनमुळे नर बेडकांच रुपांतर अर्धवट मादी बेडकात होतं . ना नर ना मादी अशी त्याची गत होते . अॅट्रॅझिनमुळे बेडूक आपली प्रजोत्पादनाची क्षमता गमावून बसतात”. तो अतिशय पोटतिडकिने आपले निष्कर्ष मांडत होता . परंतु या निष्कर्षांमुळे समोर बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांवरची नाराजी गडद होऊ लागली .शेवटी त्यांचा प्रमुख सावकाश एक एक शब्द जुळवत कावेबाजपणे बोलू लागला ,” खात्री करण्यासाठी संपूर्ण प्रयोग पुन्हा करा . आम्ही तुम्हाला पुन्हा निधी देतो . परंतु एका अटीवर . आमची खात्री पटेपर्यंत तुम्ही आपले कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध करायचे नाहीत “. तो शास्त्रज्ञ म्हणाला ,” ठीक आहे “ आपल्या प्रयोगशाळेच्या विकासाकरिता हा निधी कसा वापरता येईल याची तो मनातल्या मनात आखणी करू लागला .परंतु त्या माणसांचा हा प्रस्ताव त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यापासून रोखणारा होता हे त्यावेळी त्याला माहित नव्हते . त्याला त्यावेळी हेही माहित नव्हते कि ती एका संघर्षाची सुरुवात होती .या संघर्षाच्या एका बाजूला असणार होती , बलाढ्य बहुराष्ट्रीय अशी सिंजेंटा कृषी उत्पादन कंपनी तर दुसऱ्या बाजूला असणार होता तो स्वत: कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात काम करणारा एक सर्वसामान्य कृष्णवर्णीय संशोधक आणि प्राध्यापक डॉ. टायरोन हेज .
सन १९९७ पर्यंत विद्यापीठातील नेहमीच्या वर्तुळाबाहेर डॉ. टायरोन यांचे नाव कोणाला माहितही नव्हते .परंतु सन १९९७ मध्ये त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं . ते वळण होत नोव्हार्टीस या कंपनीच त्याना संशोधनासाठी आलेलं बोलावण . ह्या नोव्हार्टीसच रुपांतर नंतर सिंजेंटा कृषी पीक उत्पादन कंपनीत झालं . अमेरिकेतील कायद्यानुसार किटकनाशक व तणनाशक बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचं उत्पादन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करावं लागतं . सिंजेंटा कंपनी अॅट्रॅझिन या तणनाशकाचे उत्पादन करते . अमेरिकेत मका व उस उत्पादक शेतकऱ्यांकडून अॅट्रॅझिनला मोठी मागणी आहे .कंपनीला अॅट्रॅझिन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करायचं होत . टायरोनना हे एक नेहमीप्रमाणे शासकीय प्रमाणपत्रासाठी लागणार छोटस संशोधन असणार असच वाटलं होतं . परंतु नियतीच्या मनात काही वेगळच होतं .
त्यांनी संशोधनाला सुरुवात केली . त्यांनी एका टबमध्ये अॅट्रॅझिन विरहित पाणी तर दुसऱ्या टबमध्ये अॅट्रॅझिनयुक्त पाणी ठेवलं .दोन्हीमध्ये वेगवेगळे बेडूक ठेवले . टायरोन रोज त्या बेडकांचे निरीक्षण करत होते . एक दिवस नेहमी प्रमाणे ते अॅट्रॅझिनयुक्त पाण्यातील बेडूक तपासत होते . त्यातला नर बेडूक त्याना गेले काही दिवस वेगळाच दिसत होता . नर बेडकांमध्ये गळ्यावर स्वरकोष असतात .मिलनकाळात नर स्वरकोषामुळे मादीला साद घालू शकतात . परंतु टायरोनना त्या नर बेडकाच्या स्वरकोषाचा आकार खूप कमी झाल्यासारखा वाटत होता . त्यामुळे आता तो माद्यांना साद घालू शकत नव्हता . टायरोननी त्या बेडकाची चिरफाड केली आणि त्याची जननेन्द्रिय तपासायला सुरुवात केली . नराच्या वृषणाच्या बाजूला त्यांना चक्क मादीची अंडाशयं दिसली . तो बेडूक ना नर ना मादी असा झाला होता . याचा अर्थ अॅट्रॅझिनमुळे बेडूक मरत नव्हते परंतु त्यांचीं प्रजोत्पादन क्षमता नष्ट होत होती . टायरोनना हे ही आढळलं, अत्यंत कमी मात्रेतील अॅट्रॅझिनही नराच मादीमध्ये रुपांतर करू शकतं . गेल्या काही वर्षात अमेरिकेत बेडकांची संख्या प्रमाणापेक्षा कमी का होत आहे याच कारण टायरोन यांच्या लक्षात आलं .परंतु सिंजेंटा कंपनी टायरोनना आडूनआडून त्यांच्या प्रयोगातील निष्कर्षांत फेरफार करण्यास सुचवू लागली . त्यांनी टायरोनना वेगवेगळी आमिषेही दाखवली .टायरोन त्याला बधले नाहीत . मग या बलाढ्य कंपनीने टायरोनशी उघड उघड संघर्ष सुरु केला .
टायरोनचे बेडकांबाबतचे निष्कर्ष जगप्रसिद्ध ‘नेचर’ या शास्त्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले . जलस्त्रोतातून शरीरात जाणाऱ्या अॅट्रॅझिनमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हेही त्यांनी सिद्ध केले . आश्चर्याची गोष्ट अशी कि स्तनाच्या कर्करोगावरील लेट्रोझोल हे औषध सिंजेंटाच बनवते . म्हणजे कर्करोग निर्माण करणारे विष पर्यावरणात आपणच सोडायचे आणि त्याच्यावरच्या औषधातून आपणच पैसे कमवायचे हा दुहेरी उद्योग ही कंपनी करत आहे .
बेडकांवरचे दुष्परिणाम हे केवळ संकटाच्या हिमनगाचे टोक आहे. किटकनाशकं, तणनाशकं ही माणसाने त्याच्या समृद्धीसाठी तयार केलेली रसायनं आज भस्मासुरासारखी माणसावरच उलटलेली आहेत . सर्वत्र वाढत चालेल्या कर्करोगाची कारणं या रसायनांच्या अतिवापरात दडलेली आहेत . डॉ. टायरोन सारख्या तत्वनिष्ठ वैज्ञानिकांमुळे या गोष्टीची जाणीव जागृती होऊ लागली आहे .
डॉ.विनया जंगले
vetvinaya@gmail.com
मॅक्झिम गॉर्कीच्या आत्मचरित्राची त्रयी म्हणजे विश्वरूपदर्शन आहे. तो जन्मभर बिनभिंतीच्या विद्यापीठात शिकला आणि या विद्यापीठातील त्याचे शिक्षण त्याच्या लेखनभर विखुरले आहे…
मॅक्झिम गॉर्कीच्या आत्मचरित्राची त्रयी प्रसिद्ध आहे. ‘माय चाइल्डहूड डेज’
(माझे बालपण) हा अर्थातच बालपणाचे वर्णन करणारा भाग. लेखक व पत्रकार गॉर्की (१८६८-१९३६)चे मूळ नाव अॅलेक्से मॅक्सिलॉविच पेशकॉव्ह आणि त्याचा जन्म फार दारिद्र्यात नित्झनी नॉव्हगोर्ड या रशियातील खेड्यात झाला. तो पाच वर्षांचा असताना वडील पटकीने वारले. आईने त्याला आपल्या आईवडिलांकडे सोडून पुनर्विवाह केला. आजोबा शिवराळ व कठोर होते. पण आजी हळवी व लोककथांचे प्रेम असणारी. रंगारी काम करणाऱ्या आजोबांची चूल पेटणे कठीण झाले आणि आठव्या वर्षांपासून मॅक्झिम जहाजावर भांडी धुणे, कारखान्यात मजुरी करणे अशी अनेक कामे करू लागला. लिहा-वाचायला कामे करीत शिकला. कष्टाचे जिणे फार कठीण झाले तसा एकविसाव्या वर्षी तो दिशाहीन भटका मजूर बनला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात लेखन सुरू करतानाच त्याने मॅक्झिम गॉर्की हे टोपण नाव निवडले. गॉर्कीचा अर्थच दुःखाची छटा असणारा ‘कडवट’ (बिटर) असा आहे. १८९२ साली त्याची ‘मॅकर छुद्र’ ही बालपणीच्या विदारक अनुभवावरील कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर लगेच ‘चोर व शेतकऱ्याचा मुलगा’ ही गरिबीचे वास्तव चित्रण करणारी कथा आली आणि त्याचे नाव रशियात गाजू लागले. शब्दचित्रे व कथा नंतर १९०६ साली त्याची ‘मदर’
प्रसिद्ध झाली आणि तो पहिल्या रांगेतील लेखक बनला. मधल्या काळात एक कादंबरी व नाटकाने त्या यशाची पूर्वतयारी केली.
त्याच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडाचे नाव आहे ‘इन द वर्ल्ड’. उघड्या जगात तो रशियाच्या साम्राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत राहिला. साहित्यातील समाजवादी वास्तवाचा प्रणेता ठरला. नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा त्याचे नामांकन झाले होते. लिओ टॉलस्टॉय व चेकॉव्हशी त्याचे जवळचे संबंध होते. हलकीफुलकी अंगमेहनतीची कामे करता करता त्याने वाचन वाढवले. एका बाजूला विलक्षण अनुभव व दुसऱ्या बाजूला ग्रंथ त्याला ‘रचत’ होते. मार्क्सवादी चळवळीत तो एका निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्याच्या साहित्यकृतीवर नाटके व चित्रपट निघाले. कॅप्रीच्या बेटावर त्याने सात वर्षे काढली. तीन वेळा हद्दपारी भोगली. ही संघर्षकथा आजही खिळवून ठेवते. ‘माय युनिव्हर्सिटीज्’ हा आत्मचरित्राचा तिसरा भाग १९२३ साली प्रसिद्ध झाला. कुठल्याही विद्यापीठात नियमित विद्यार्थी नसताना त्याने ‘माझी विद्यापीठे’ हे अनेक वचनी नाव मुद्दाम उपरोधासाठी निवडले असावे. गॉर्कीच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या भागाची सुरुवात वाचताना पन्नास वर्षांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेतील ‘कमवा व शिका’ योजनेतील सवर्ण गरीब मुलांच्या चित्तरकथा आठवतात. औपचारिक शिक्षण सोडून गेलेले बरेच ‘लेब्राट’ (काम करून शिकणारे) ‘बेसकाट’ (मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक) हेच द्वंद्व गॉर्कीच्या चरित्रात दिसते.
गॉर्कीचा जन्मच ज्ञानसेवा करण्यासाठी आहे आणि विद्यापीठांना त्याच्यासारख्या तरुणांची गरज असल्याचे सांगतो. त्याचे ऐकून तो शिक्षण घेण्याच्या ओढीने आजीला सोडून सल्लागाराबरोबर प्रवासाला निघतो. तेव्हा आजी सांगते, ‘आता लोकावर चिडू नको. तू रागीट, हट्टी व भांडखोर आहेस. थेट आजोबावर गेला आहेस. त्याने काय वाढून ठेवलेय ते बघ. मूर्खासारखा जगला आणि बावळटासारखा संपला, कडवट म्हातारा. एक ध्यानात ठेव,
परमेश्वर माणसाला जोखत नाय. ती सैतानाची विशेष गुणवत्ता. ठीक गुडबाय.’ डोळे पुसत ती आता त्यांची पुर्नभेट होणार नाही असे म्हणते. तो अस्वस्थपणे भटकत राहील आणि ती मरून जाईल हे तिचे भाकीत खरे ठरल्याचे गॉर्कीने तटस्थपणे नोंदवले आहे. साध्या सरळ कथनाचा हा प्रवाह असंख्य वळणे घेतो. क्रांतीपूर्व रशियातील उलथा-पालथी आणि बदलत्या समाजप्रवाहाचे दर्शन सहजतेने घडवले आहे. ‘अॅन्ड नाऊ आय एम इन शल्फ-तातार कझान, इन क्राऊडेड वन-स्टोरी हाऊस…’ हे सारे मुंबैच्या कामगार चाळीतील वास्तव वाटते. ‘डाव्या’ नारायण सुर्व्यांच्या ‘माझे विद्यापीठ’चे उगमस्थान अथवा मूलाधार गॉर्कीच्या विद्यापीठात आहे. मात्र त्यांचे विद्यापीठ एका शहरातील आहे. गॉर्कीची ‘विद्यापीठे’ रशियातील अनेक गावांतील आहेत. येर्व्हेश्नॉव्हची आई त्याला कझानला कशासाठी आलास हा प्रश्न तिसऱ्या दिवशी विचारते. ‘विद्यापीठात प्रवेश घ्यायला’ असे तो म्हणताच ती चक्रावून भाजी चिरायच्या ऐवजी स्वतःचे बोट कापून घेते. जहाजावर स्वयंपाकी होता एवढ्या अनुभवावर त्याला विद्यापीठात प्रवेश कसा मिळणार या प्रश्नाने ती गोंधळून जाते.
हळुहळू उच्च शिक्षण हे दिवास्वप्न बनले. कुणाची मदत मिळेल, आणि नशीब उघडेल ही आशा त्याने सोडून दिली. स्वावलंबी जगण्याने ‘कोवळ्या वयातच मला परिस्थितीचा प्रतिकार करीत एखादा माणूस हा माणूस बनण्याचे पहिले ज्ञान मिळवतो ते मला झाले’ असे त्याने म्हटले आहे. उपाशी मरावे लागेल म्हणून तो होल्गा नदीकाठी गोदी कामगार बनला. शिक्षक प्रशिक्षण कॉलेजातील बश्किन हा एक विद्यार्थी त्याच्या परिचयाचा झाला. त्याचे आवडते पुस्तक ‘द काऊन्ट ऑफ मॉन्ते क्रिस्तो’ हे होते. तो कथा छान सांगायचा. वेश्यांसाठी गीते लिहायचा. त्याच्या लेखनशैलीचा मॅक्झिमला मत्सर वाटे. त्रुसोव्हच्या दुकानावर ‘घड्याळ दुरुस्ती दुकान’ ही पाटी होती. पण तो चोरीचा माल विकायचा. तो सायबेरिया, बोखारिया अशा मध्य आशियातील मुसलमानांच्या कथा छान सांगायचा. तिसऱ्या झार अलेक्झांडरच्या दरबारातील व चर्चमधील श्रेणीबद्ध भानगडी उकरायचा. हा झार चांगला होता पण दहशतवाद्यांनी त्याला ठार केला. अशी माणसं, परिसर आणि वाचन यामुळे साहसाने वेगळी वाट शोधण्याची आच लागली.
गॉर्कीने व्यक्तिचित्रे व कथांचा संग्रह प्रसिद्ध केला. त्यांचे मूलाधार आत्मचरित्रात सापडतात. जॉर्ज प्लेटनेव्ह त्याला ग्रामीण भागात शिक्षक होण्याचे गाजर दाखवतो. तो अभ्यासक्रम पूर्ण करूनही मॅक्झिमला वयाच्या अटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. ते आळीपाळीने भाड्याच्या खोलीत एकच कॉट वापरीत. त्यांची घरमालकीण गाल्किना विद्यार्थ्यांना जोडीदारीण गाठून देई. एक अपत्य असलेली बाई अंधार पडताच एका विद्यार्थ्याच्या खोलीत जाई. ती श्रीमंत बाई त्या तरुणाला मात्र आवडत नसे. हा फार्स मुळातून वाचण्यासारखा आहे. नवीन कामाच्या शोधात भटकताना गॉर्कीने केलेले समाजाचे सूक्ष्म निरीक्षण महत्त्वाचे आहे. आपण समाजात, विशिष्ट गावात व संस्कृतीत वाढतो. पण त्यांच्या समग्र साक्षरतेचा दावा कुणीच करू शकत नाही. बेकायदा छापखाना चालवणाऱ्या काही तरुणांना अटक होते. गॉर्कीला सावध वागण्याची सूचना मिळते. आजूबाजूला हेर असतात. क्रांतीत सहभागी होताना त्याला हे सर्व अनुभव मार्गदर्शक ठरले. लेनिनच्या धोरणांचा पुरस्कार त्याने सुरुवातीला केला. पण त्याने लोकशाही समाजवादावरील श्रद्धेने पुढे त्याच्यावर टीका केली. त्याची किंमत मोजली; पण हुकूमशाही साम्यवाद त्याला नको होता.
बेकरीत नोकरी करताना ज्याच्याकडे तो संगीताचे धडे घेत होता त्या शिक्षकालाच पैसे चोरताना पकडतो. परत केलेल्या पैशातील दहा रूबल शिक्षक परत मागतो. असे अनेक प्रसंग गॉर्कीला मानसिक उद्वेगाने आत्महत्येचे प्रयत्न करायला लावतात. अशाच एका प्रसंगावर त्याने ‘अॅन इन्सिडन्ट इन द लाइफ ऑफ मॅकर’ ही कथा लिहिली. झारच्या पोलिसांचे हल्ले, चर्चचे अडथळे, गोळीबार, रोमासची हद्दपारी अशा अनेक घटनांचे कथन गॉर्कीने अलिप्तपणे केले आहे. आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न धक्कादायक आहेत.
समाराला स्थलांतर केल्यानंतर एका डेपोत रात्रीचा रखवालदार झाल्यानंतर गॉर्कीला वेगळ्याच अधोलोकाचे दर्शन घडते. देहविक्रय करणाऱ्या लुईसाचे शब्दचित्र त्याने सहृदयतेने रेखाटले आहे. इथेच तो ग्रामीण कलाकारासाठी गीते लिहू लागला. पशू व मानव यांच्यामधील संघर्ष तो समजून घेत होता. अन्य साहित्यिकांच्या भेटीचे उल्लेख त्याने भारावून केले आहेत. क्रांतिकारक म्हणून गुप्त पोलिस त्याची चौकशी करतात. हा फार्स रंजक व उद्बोधक आहे. त्यांचा प्रमुखच त्याला थोर लेखक कोरोलेन्कोची भेट घ्यायला सांगतो आणि त्यांच्या चर्चांचा वृत्तान्त लेखकाच्या जडणघडणीचे अंतरंग उलगडत जातो. वाङ्मयीन संस्कृतीवरचे त्याचे भाष्य मराठीला लागू पडावे. तो वृत्तपत्रात काम करू लागला. नंतर कथाकार ते कादंबरीकार असा प्रवास. प्रेमाच्या अनुभवांचे चित्रण देखील त्याने हातचे काही न राखता केले आहे.
थोडक्यात ढोंगी, उथळ,
बौद्धिकतेचा बडेजाव मांडणाऱ्या साहित्य संस्कृतीचा पोकळपणा समजून घेत त्याने त्या धुक्यातून शोधलेली स्वतःची वाट महत्त्वाची ठरली. ती त्याला विद्यापीठीय पदवीने मिळवून दिली नव्हती. त्याच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातील अनुभवातून ती सापडली होती.
-- डॉ. आनंद पाटील
(लेखक गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख आहेत)
मूळ लेख इथे वाचता येईल.